Laura Wolvaardt  X/ICC
Cricket

INDW vs SAW: भारताविरूद्धच्या T20 मालिकेसाठी द. आफ्रिका संघाची घोषणा; 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

India vs South Africa Women T20I Series: भारत दौऱ्यात होणाऱ्या टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघाची घोषणा झाली असून अनुभवी अष्टपैलू खेळाडूचे संघात पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

Cricket South Africa squad : दक्षिण आफ्रिका महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे आणि कसोटी सामने खेळून झाले असून या सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी विजय मिळवले आहेत. आता ५ जुलैपासून ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

सध्या या दौऱ्यावर असलेल्या बहुतेक खेळाडू टी२० संघातही आहेत. यात फक्त अनुभवी अष्टपैलू क्लो ट्रायनचा समावेश करण्यात आली आहे. ती पाठीच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर होती. पण आता तिचे संघात पुनरागमन झाले आहे.

याशिवाय वनडे आणि कसोटी सामने खेळलेल्या डेलमी टकर आणि नॉनदुमिसो शांगासे यांना टी२० सामन्यात संधी न मिळाल्याने त्या मायदेशी परततील. तसेच टी२० मालिकेतही दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व लॉरा वोल्वार्ड करणार आहे.

या टी२० मालिकेतील तिन्ही सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ही मालिका आगामी महिला टी२० वर्ल्ड कपच्यादृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

असा आहे दक्षिण आफ्रिकेचा टी२० संघ -

लॉरा वोल्वार्ड (कर्णधार),ऍनेक बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लार्क, ॲनेरी डेर्कसन, मिक डी रिडर, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, सुन लुस, एलिझ-मारी मार्क्स, नॉनकुलुलेउको एलाबा, तुमी सेखुखुने, क्लो ट्रायन.

टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • 5 जुलै - पहिला टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 7 जुलै - दुसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

  • 9 जुलै - तिसरा टी20 सामना, चेन्नई (वेळ - संध्या. 7.00 वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT