rishabh pant esakal
Cricket

Rishabh Pant DC : ऋषभ पंतला Delhi Capitals सोबत नाही राहायचंय? कर्णधाराच्या 'त्या' ट्विटने चाहते संभ्रमात

IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार हे निश्चित झाले आहे. BCCI ने प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडूंना कायम राखण्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रमुख चेहरे हे त्यांच्या त्यांच्या फ्रँचायझीसोबत राहतील हे पक्कं झालं आहे. यात ऋषभ पंतचाही समावेश आहेच, पण...

Swadesh Ghanekar

Rishabh Pant Delhi Capitals IPL 2025 Auction : ऋषभ पंतच्या एका ट्विटने दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या चाहत्यांची झोप उडवली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार आहे, हे आतापर्यंत सर्वांना माहित झालं आहे. BCCI ने सर्व फ्रँचायझी मालकांची मागणी लक्षात घेऊन ६ खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता फ्रँचायझीचे सहा खेळाडू कोण, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. फ्रँचायझी त्यांच्या प्रमुख खेळाडूंना उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांना; चेन्नई सुपर किंग्स ऋतुराज गायकवाड, महेंद्रसिंग धोनी यांना; तसेच दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंत, अक्षर पटेल यांना कायम राखू शकतात. DC चे मालक पार्थ जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी ऋषभ हा आमची पहिली पसंती असेल, हे स्पष्ट केले होते. पण, आता ट्विस्ट आला आहे आणि तेही ऋषभच्या ट्विटमुळे...

ऋषभ पंतने एक ट्विट केलं आणि त्यात त्याने फॅन्सला ऑक्शनसंदर्भात एक प्रश्न विचारला. मेगा लिलावात माझं नाव आलं, तर मला किती रक्कम मिळेल, असा तो प्रश्न होता. भारतीय यष्टिरक्षकाच्या या ट्विटने त्याला दिल्ली कॅपिटल्ससोबत राहायचे नाही किंवा दिल्ली कॅपिटल्स त्याला कायम राखणार नाही, असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे.आयपीएल २०२५ साठी नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मेगा ऑक्शन होण्याचा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्ज मध्ये जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण एम एस धोनीच्या आयपीएल निवृत्तीनंतर CSK ला चांगला यष्टीरक्षक व आक्रमक फलंदाजाची गरज भासेल.ऋषभ पंत हा योग्य पर्याय आहे. पण, दिल्ली कॅपिटल्स संघाचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी ऋषभ संघात कायम राहील असे निश्चित केले होते. पण, ऋषभच्या ट्विटने पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

रिटेन्शन स्लॅब...

फ्रँचायझी ५ कॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना कायम राखू शकतात. यामध्ये किती भारतीय किंवा परदेशी खेळाडू कायम ठेवयाचे हा निर्णय त्या त्या फ्रँचायझीवर सोपवला गेला आहे. यामध्ये जास्तीत जास्त दोन अनकॅप्ड खेळाडूंनाही कायम राखता येईल. अनकॅप्ड खेळाडूसाठी ४ कोटी ही रक्कम ठरवली गेली आहे.

  • पहिल्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी

  • दुसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी

  • तिसऱ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला ११ कोटी

  • चौथ्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १८ कोटी

  • पाचव्या क्रमांकाच्या रिटेन खेळाडूला १४ कोटी

  • सहाव्या क्रमांकाच्या अनकॅप्ड रिटने खेळाडूला ४ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : चोरीच्या पैशातून चंगळ, ६ तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, १० वर्ष जंगलात लपून बसला; सराईत बाईकचोराला अशी झाली अटक

Latest Marathi Breaking News : शिवसेनेला मोठा धक्का; अजून काही नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश

Hotstar सब्स्क्रिप्शन पूर्णपणे फ्री! सोबत मिळणार 15GB डेटा, काय आहे हा धमाकेदार प्लॅन? जाणून घ्या

Mumbai CNG crisis: कसं होणार मुंबईचं? सीएनजी तुटवड्याने थबकली... ऑटोचं भाडं किती वाढलं? विमानतळावर जाण्यासाठी कॅबसुद्धा नाही

Gadhinglaj News: गडहिंग्लजमध्ये चार पक्षांची महाआघाडी एकत्र; राष्ट्रवादीविरोधात रंगणार थरारक लढत!

SCROLL FOR NEXT