Dhruv Jurel Sunil Gavaskar  esakal
Cricket

Dhruv Jurel : हा पुढचा धोनी होणार! ध्रुव जुरेलबद्दल कोणत्या दिग्गजाने केली एवढी मोठी भविष्यवाणी?

अनिरुद्ध संकपाळ

Dhruv Jurel Sunil Gavaskar : इंग्लंडविरूद्धच्या रांची येथे खेळवण्यात येत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 307 धावा केल्या. यामध्ये विकेटकिपर बॅट्समन ध्रुव जुरेलने 90 धावांची धडाकेबाज खेळी केली. यामुळे पहिल्या डावात इंग्लंडची आघाडी पन्नासच्या आत आली.

ध्रुव जुरेलने आठव्या विकेटसाठी कुलदीप यादवसोबत 76 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. ध्रुव जुरेलच्या या खेळीवर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर जाम खूष झाले. त्यांनी जुरेलची तुलना एमएस धोनीशी करत मोठं वक्तव्य केलं.

काय म्हणाले गावसकर?

रांची कसोटीत समालोचन करताना सुनिल गावसकर यांनी ध्रुव जुरेलची तुलना महेंद्रसिंह धोनीशी केली. ते म्हणाले की, जुरेलचा प्रेजेंस ऑफ माईंट पाहून मला वाटतं की तो पुढचा महेंद्रसिंह धोनी आहे. ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगमध्ये देखील आपले चुणूक दाखवून दिली आहे.

त्याने राजकोट कसोटीत जबरदस्त विकेटकिपिंग केली होती. त्यानंतर रांचीत त्याने कुलदीपसोबत 76 धावांची भागीदारी रचत भारताची सामन्यावर पुन्हा पकड निर्माण करून दिली. जुरेलने 10 व्या विकेटसाठी देखील आकाशदीपसोबत 40 धावांची भागीदारी रचली.

जुरेलने धोनीला प्रश्न विचारला होता

ध्रुव जुरेलनेही महेंद्रसिंग धोनीला आपला आदर्श मानले आहे. आयपीएलदरम्यान तो अनेकदा माहीचा सल्ला घेताना दिसला आहे. ज्युरेलने यापूर्वी असेही सांगितले होते की, त्याने माही भाईला विचारले होते की, तू तुझ्या करिअरमध्ये 6 आणि 7 व्या क्रमांकावर जास्त फलंदाजी केली आहेस आणि तरीही तुझी कामगिरी उत्कृष्ट आहे, याचे रहस्य काय आहे? मी माझ्या संघासाठी देखील हे करू शकतो का?

जुरेलला हे उत्तर मिळाले

ज्युरेलने सांगितले की, माही भाईने त्यांना सांगितले होते की, त्यांच्या कामात यशापेक्षा अपयश जास्त आहेत, त्यामुळे इतका विचार करू नका. फिनिशर असण्याची एकच चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वात वाईट अपेक्षा करा आणि त्यानुसार तयारी करा कारण तुम्ही सामना चांगला पूर्ण करू शकत नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT