dhruv jurel esakal
Cricket

Dhruv Jurel IND vs ENG 4th Test : शतक हुकल्याचं दुःख नाही कारण... ध्रुव जुरेल असं का म्हणाला?

Dhruv Jurel Century : ध्रुव जुरेलने भारतीय संघ अडचणीत असताना 90 धावांची खेळी केली. यामुळे भारत सामन्यात पुनरागमन करू शकला.

अनिरुद्ध संकपाळ

Dhruv Jurel India Vs England Test Series : चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताकडून ध्रुव जुरेलने दमदार फलंदाजी करत 90 धावांची खेळी केली. ही खेळी भारताला सामन्यावर पकड मजबूत करण्यासाठी महत्वाची ठरली. सुनिल गावसकरांनी देखील या खेळीचे तोंडभरून कौतुक करत जुरेलची थेट महेंद्रसिंह धोनीशी तुलना केली.

जुरेलचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असून त्यात तो शतकाच्या इतक्या जवळ पोहचूनही बाद झाल्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र ध्रुव जुरेलला शतक हुकल्याचे कोणतेही दुःख नाही.

ध्रुव जुरेलने 90 धावांची खेळी केल्यानंतर सुनिल गावसकर यांनी त्याची पाठ थोपटली. ते म्हणाले की, 'ध्रुव जुरेलचे प्रेझेंस ऑफ माईंड पाहून मला असं वाटतं की तो पुढचा एमएस धोनी होईल.' गावसकरांनी हे वक्तव्य समालोचन करताना केलं होतं.

या वक्तव्यावर ध्रुव जुरेल म्हणाला की, 'सुनिल गावसकरांसारख्या दिग्गजांकडून असं काही ऐकायला मिळणं हा सुखद अनुभव आहे. ड्रेसिंग रूममधला मूड चांगला होता. माला कोणतीही विशेष सुचना करण्यात आली नव्हती. फक्त जाऊन तुमचा खेळ करा. चेंडू पाहा आणि खेळा. जेवढा वेळ जास्त मी खेळेने तेवढं चांगलं आहे.'

भारताच्या पहिल्या डावात सर्वात शेवटचा बाद होणारा फलंदाज हा ध्रुव जुरेलच होता. तो 90 धावांवर बाद झाला. त्याचे पहिले वहिले कसोटी शतक फक्त 10 धावांनी हुकले.

यावर जुरेल म्हणाला की, 'मला शतक हुकल्याचं काही वाटत नाही. ही माझी पदार्पणाची कसोटी मालिका आहे. मला फक्त ट्रॉफी उंचावायची आहे. भारताकडून कसोटी सामना खेळायला मिळणं हे माझं लहाणपणापासूनचं स्वप्न होतं.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT