Dhruv Jurel Ind vs Eng Marathi News sakal
Cricket

Dhruv Jurel Ind vs Eng : दमदार खेळीनंतर ध्रुव जुरेलने कारगिल युद्धात लढलेल्या वडिलांना केला सलाम! फोटो व्हायरल

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे.

Kiran Mahanavar

Dhruv Jurel Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रांची येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो रूटच्या शतकाच्या जोरावर 353 धावा केल्या. भारतीय संघ पहिल्या डावात संघर्ष करताना दिसला आणि आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. रोहित शर्मा, शुबमन गिल, रजत पाटीदार, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान अशी मोठी नावे धावा करण्यात अपयशी ठरले.

ध्रुव जुरेलने ठोकले कारकिर्दीतील पहिले अर्धशतक

भारतीय संघाचे आघाडीचे फलंदाज लवकर आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत होते. पण ध्रुव जुरेलने आपली ताकद दाखवून दिली. रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 96 चेंडूंचा सामना करत त्याने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने अर्धशतक झळकावले. यावेळी त्याने कुलदीप यादवसोबत 76 धावांची मौल्यवान भागीदारी केली आणि धावसंख्या 250 धावांच्या पुढे नेली.

ज्युरेलने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ते एका खास पद्धतीने साजरे केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या आणि कारगिल युद्धातही लढलेल्या वडिलांना सलाम केला. ज्युरेलने पहिले कसोटी अर्धशतक वडिलांना समर्पित केले. जुरेलच्या अर्धशतकाने रोहित शर्माही खूप उत्साहित दिसत होता. ड्रेसिंग रूममधूनच त्याने ज्युरेलला स्टँडिंग ओव्हेशन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT