T20 World Cup 2024 hotstar Marathi News sakal
Cricket

IND vs PAK मॅचची तिकिटे करोडोमध्ये पण तुम्ही घ्या T20 World Cup चा 'फ्री'मध्ये आनंद, अट फक्त एकच

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे 2 जूनपासून रंगणार आहे.

Kiran Mahanavar

Hotstar To Stream T20 World Cup 2024 For Free On Mobile : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे 2 जूनपासून रंगणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाच जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. आयपीएल 2024 नंतर लगेचच भारतीय खेळाडू आसीसी स्पर्धेची तयारी सुरू करतील.

चाहते भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. कारण दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. पण सामन्याच्या तिकिटांची किमती गगनाला भिडल्या आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी SeatGeek या साइटवरील सर्वात महाग तिकिटाची किंमत $175,000 म्हणजेच अंदाजे 1.4 कोटी रुपये आहे.

दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. यावेळी तुम्ही मोफत सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

यावेळीही क्रिकेट चाहत्यांना आसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांचा मोफत आनंद लुटता येणार आहे. होय, खरंतर हॉट स्टारने जाहीर केले आहे की आगामी टी-20 वर्ल्ड कपमधील सर्व सामने विनामूल्य पाहता येतील. हॉट स्टारने तिच्या अधिकृत X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.

यासोबत या ऑफरवर एक अट पण घातली आहे. ती म्हणजे तुम्ही सामना फक्त मोबाईलवर पाहू शकता. याचा अर्थ असा आहे की जर तुमच्या फोनवर हॉट स्टार ॲप असले तर तुम्ही टी-20 वर्ल्डकप 2024 चे सामने विनामूल्य पाहू शकतील, परंतु चाहत्यांना हे सामने टीव्ही किंवा लॅपटॉपसारख्या मोठ्या स्क्रीनवर पहायचे असतील तर हॉट स्टार प्रीमियम घ्यावी लागेल.

जर आपण टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाच्या तयारीबद्दल बोललो, तर सध्या ब्लू आर्मी इंग्लंडसोबत कसोटी क्रिकेट खेळत आहे, परंतु आगामी टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या आधी आयपीएल घरच्या मैदानावर सुरू होणार आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारतीय खेळाडू येत्या काही महिन्यांत बरेच टी-20 सामने खेळणार आहेत, ज्याच्या आधारे ते मोठ्या स्पर्धेसाठी आपला सर्वोत्तम संघ शोधू शकतील.

टी-20 वर्ल्ड कपसाठी संघांचे गट

  • अ गट : अमेरिका, भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा

  • ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान

  • क गट : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी

  • ड गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध आयर्लंड - 5 जून, न्यूयॉर्क

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 9 जून, न्यूयॉर्क

  • भारत विरुद्ध अमेरिका - 12 जून, न्यूयॉर्क

  • भारत विरुद्ध कॅनडा - 15 जून, फ्लोरिडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT