JoeRoot sakal
Cricket

Joe Root - जो रूटने महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला; तेंडुलकरच्या पराक्रमाच्या जवळ पोहोचला

Joe Root ENG vs WI Test : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अडखळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला जो रूटने आधार दिला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा याचा विक्रम मोडला.

Swadesh Ghanekar

England vs West Indies Test : इंग्लंड - वेस्ट इंडिज यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत जो रूटने ( Joe Root) आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १० बाद २८२ धावा केल्या आणि त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ ५४ धावांवर तंबूत परतला होता. अशा परिस्थितीत अनुभवी फलंदाज जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स मैदानावर उभे राहिले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. दरम्यान जो रूटने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याचा मोठा विक्रम मोडला आहे.

क्रेग ब्रेथवेट ( ६१), जेसन होल्डर ( ५९) आणि जोशुआ डा सिल्वा ( ४९) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २८२ धावा उभ्या केल्या. इंग्लंडच्या गस अॅटकिन्सन याने सर्वाधिक ४, तर ख्रिस वोक्स व मार्क वूड यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडची सुरुवात काही खास झाली नाही. झॅक क्रॉली ( १८), बेन डकेट ( ३), मार्क वूड ( ०), ऑली पोप ( १०) व हॅरी ब्रूक ( २) हे ५४ धावांत तंबूत परतले.

वेस्ट इंडिजच्या जेडन सिल्सने इंग्लंडला ३ धक्के दिले. पण, स्टोक्स व रूट मैदानावर उभे राहिले आणि दोघांनी संघाला २३ षटकांत ५ बाद ११० धावांपर्यंत पोहोचवले आहे. दरम्यान, ४३ धावांवर खेळणाऱ्या जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सातव्या क्रमांकावर कूच केली. त्याने ११,९५४ धावा करताना ब्रायन लाराला ( ११,९५३) मागे टाकले. शिवाय इंग्लंडकडून कसोटीत पाचव्या क्रमांकावर द्विशतक अन् २००० हून अधिक धावा करणारा तो ग्रॅहम थॉर्प व डेव्हिड गोवर यांच्यानंतर तिसरा फलंदाज ठरला. त्याने एडबस्टन येथे कसोटीत सर्वाधिक धाव असलेल्या अॅलिस्टर कूक ( ८६९) याचाही विक्रम मोडला.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर - १५९२१

रिकी पाँटिंग - १३३७८

जॅक कॅलिस - १३२८९

राहुल द्रविड - १३२८८

अॅलिस्टर कुक - १२४७२

कुमार संगकारा - १२४००

जो रूट - ११९५४*

ब्रायन लारा - ११९५३

शिवनारायण चंद्रपॉल - ११८६७

माहेला जयवर्धने - ११८१४

अॅलन बॉर्डर - १११७४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT