Jack Alabaster passes away News Marathi sakal
Cricket

Jack Alabaster : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! माजी दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

Jack Alabaster passes away : क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. आज म्हणजेच 10 एप्रिल रोजी माजी दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला.

Kiran Mahanavar

Jack Alabaster passes away : क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. आज म्हणजेच 10 एप्रिल रोजी माजी दिग्गज खेळाडूने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या खेळाडूचा कसोटी क्रिकेटमध्ये खूप दबदबा होता. या माजी क्रिकेटपटूने आपल्या संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले, मात्र आज या खेळाडूने जगाचा निरोप घेतला.

क्रिकेट चाहत्यांसाठी ही दु:खद बातमी न्यूझीलंडमधून आली आहे. न्यूझीलंडचा माजी लेगस्पिनर जॅक अलाबास्टर यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1955 ते 1972 दरम्यान 21 कसोटी सामन्यामध्ये ते आपल्या देशासाठी खेळले, ज्यात त्यांनी 49 विकेट घेतल्या. या कालावधीत न्यूझीलंड संघाने 4 कसोटी सामने जिंकले होते, जॅक अलाबास्टर देखील या विजयी संघाचा एक भाग होता.

त्यांनी 1955 मध्ये पाकिस्तानविरुद्ध डेब्यू सामना खेळला होता. जॅकने 1955-56 मध्ये भारताला भेट दिली होती. याशिवाय त्यांनी 1958 मध्ये इंग्लंड आणि 1961 ते 1962 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.

जेव्हा जॅक अलाबास्टर हे कसोटी मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी मालिकेतील पहिल्याच सामन्यात 7 विकेट घेत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आणि या संपूर्ण मालिकेत जॅकने एकूण 22 विकेट घेतल्या होत्या.

यासोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 143 सामने खेळले, ज्या दरम्यान 500 बळी घेतले. यावरून ते गोलंदाजीत किती माहीर होते याची कल्पना येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT