Saeed Ahmed Died Marathi News 
Cricket

Saeed Ahmed Died : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! माजी कर्णधारने घेतला जगाचा निरोप

Saeed Ahmed यांच्या निधनामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे.

Kiran Mahanavar

Saeed Ahmed Died News : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सईद अहमद यांचे निधन झाले आहे. ते काही काळ आजारी होते. वयाच्या 86 व्या वर्षी लाहोरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे.

सईद अहमदबद्दल सांगायचे तर, आपल्या कारकिर्दीत 1958 ते 1973 पर्यंत पाकिस्तानसाठी 41 कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी 1969 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले होते. त्यावेळी हनिफ मोहम्मदच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आले.

सईदने आपल्या कसोटी कारकिर्दीत 2991 धावा केल्या, ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. यापैकी त्याने केवळ भारताविरुद्ध तीन शतके झळकावली. फलंदाजीसोबतच त्याने गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले. सईद अहमदने ऑफस्पिनर म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 22 विकेट्सही घेतल्या आहेत.

सईद अहमदचा जन्म स्वातंत्र्यापूर्व भारतात झाला होता. त्यांचा जन्म 1937 मध्ये जालंधर येथे झाला. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. हा तोच सामना आहे ज्यात हनिफ मोहम्मदने 970 मिनिटे फलंदाजी केल्यानंतर 337 धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.

या सामन्यात सईदने हनिफ मोहम्मदसोबत तिसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. या कालावधीत त्याने 65 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा संघ केवळ 319 धावा करू शकला. मात्र, त्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सईद अहमद यांच्या निधनावर शोक व्यक्त करत एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, आमचे माजी कसोटी कर्णधार सईद अहमद यांच्या निधनाने पीसीबी दु:खी आहे आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. त्याने मनापासून पाकिस्तानची सेवा केली आणि त्याने कसोटी संघासाठी केलेल्या कामाचा पीसीबी आदर करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT