Gautam Gambhir Sakal
Cricket

Team India Coach: गौतम गंभीरच घेणार द्रविडची जागा, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाबाबत डील फायनल?

Gautam Gambhir: गौतम गंभीरच भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होणार असल्याचे जवळपास पक्के असल्याची माहिती समोर येत आहे.

Pranali Kodre

Team India Coach: भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात सध्या भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ (BCCI) आहे. यासाठी बीसीसीआयने 27 मे पर्यंत उमेदवारी अर्ज करण्यासही सांगितले होते. यादरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अनेक मोठी नावे समोर आली, यातील गौतम गंभीरचे नाव आघाडीवर आहे.

नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सने गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. त्यानंतर त्याच्या नावाची अधिकच चर्चा होत आहे. त्यातच आता असे समजत आहे की जवळपास त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सध्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आहे. पण द्रविडचा कार्यकाळ जून 2024 मध्ये संपणार आहे. तसेच तो पुन्हा अर्ज करणार नसल्याचे म्हटले जात आहे.

क्रिकबझने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयमधील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असलेल्या मोठ्या आयपीएल फ्रँचायझी मालकाने सांगितले आहे की गौतम गंभीरची भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून निवृत्ती होण्याचे डील पक्के झाले आहे.

याशिवाय एका मोठ्या समालोचकानेही याबाबत सांगितले आहे की गंभीरला या जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली आहे.

रिपोर्ट्सनुसार गंभीरने अधिकृतरित्या उमेदवारी अर्जही भरला आहे. तसेच त्याने त्याच्या जवळच्या लोकांनाही तो मुख्य प्रशिक्षकपदाबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे सांगितले आहे. त्याने याबाबत कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानलाही याबाबत कल्पना दिली आहे.

याशिवाय क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि गंभीर यांच्यात बरीच चर्चा झाली आहे. त्यांच्यात 'देशासाठी करायचे आहे' हा चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता, असेही म्हटले जात आहे.

दरम्यान, अर्ज करण्याची अंतिम तारीख संपली असली, तरी नियुक्तीबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता खरंच गंभीर भारताचा नवा प्रशिक्षक होणार की आणखी दुसऱ्या कोणाला ही जबाबदारी मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT