Hardik Pandya Sakal
Cricket

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याने रचला इतिहास! रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय

ICC T20I Hardik Pandya Ranking: आयसीसीने नुकतीच ताजी टी20 क्रमवारी जाहीर केली असून यात हार्दिकने मोठी झेप घेत इतिहास रचला आहे.

Pranali Kodre

ICC T20I Cricket Ranking: टी२० वर्ल्ड कप भारतीय संघाने जिंकल्यानतंर आयसीसीने बुधवारी (३ जुलै) ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने गरुड झेप घेतली आहे.

हार्दिकने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्याने हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने या टी२० वर्ल्ड कपमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगले योगदान दिले होते. त्याने १४४ धावा करण्याबरोबरच ११ विकेट्स घेतल्या होत्या.

त्याच्या या कामगिरीनंतर हार्दिक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. तो पुरुषांच्या टी२० क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.

हार्दिक आता या क्रमवारीत श्रीलंकेच्या वनिंदू हसरंगासह संयुक्तरित्या अव्वल क्रमांकावर आहे. हार्दिक आणि हसरंगा यांचे आता २२२ गुण आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस आला आहे, तर चौथ्या क्रमांकावर सिकंदर रझा आहे. तसेच पाटव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब अल हसन आहे.

गोलंदाजी क्रमावारीत एन्रिच नॉर्कियानेही मोठी झेप घेतली असून तो आता ७ स्थानांनी वर आला असून दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. पहिल्या क्रमांकावर आदिल राशिद कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर वनिंदू हसरंगा आहे. राशिद खान चौथ्या क्रमांकावर घसरला आहे, तर पाचव्या क्रमांकावर जोश हेजलवूड आहे.

त्याचबरोबर टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली होती. १५ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराह १२ क्रमांकांनी पुढे येत १२ व्या स्थानी आला आहे. तसेच १७ विकेट्स घेणारा आर्शदीप सिंग १३ व्या क्रमांकावर आला आहे.

याशिवाय कुलदीप यादवने अव्वल १० मध्ये स्थान मिळवले आहे, तो आता ऍडम झाम्पासह संयुक्तरित्या ८ व्या क्रमांकावर आला आहे. भारताचा अक्षर पटेल ७ व्या क्रमांकावर आहे.

फलंदाजी क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. केवळ दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मार्करम दोन स्थानांनी घसरून १० व्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ट्रेविस हेड कायम आहे, तर सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. फिल सॉल्ट, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT