Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumor  esakal
Cricket

Haridk Pandya Video : गुजराती ब्रेन! घटस्फोट झाला तरी नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या प्रॉपर्टीचा 70 टक्के हिस्सा?

Hardik Pandya Natasa Stankovic : हार्दिक पांड्याने लग्नापूर्वीच शक्कल लढवली होती. जुना व्हिडिओ होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumor : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविच यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे वृत्त आले होतो. या दोघांमधील मतभेद हे घटस्फोटापर्यंत पोहचले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच माध्यमांमध्ये हार्दिक पांड्याला नताशासाठी आपल्या 70 टक्के प्रॉपर्टीवर पाणी सोडावे लागणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

रेडिट वापरकर्त्याने नताशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पांड्या हे आडनाव हटलवं असल्याचे सांगितले. यानंतर पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना ऊत आला. त्यानंतर नताशाला हार्दिकच्या प्रॉपर्टीचा 70 टक्के हिस्सा द्यावा लागणार असंही बोललं जात आहे. मात्र हे सर्व खोटं देखील ठरू शकतं. कारण हार्दिक पांड्याचाच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गौरव कपूरच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या यूट्यूब चॅनलवर बोलताना हार्दिक पांड्याने आपल्या प्रॉपर्टीबद्दल एक मोठी माहिती दिली होती. हार्दिक पांड्या या व्हिडिओत म्हणतो की माझ्या प्रॉपर्टीचे सर्व नियंत्रण हे माझ्या कुटुंबीयांकडे आहे. विशेषकरून माझ्या आईची याच्यातील हिस्सेदारी मोठी आहे.

हार्दिकची आई त्याला म्हणाली की तुझ्या अकाऊंटमध्ये मी पार्टनर असणार आहे. त्यामुळं माझ्या सर्व अकाऊंटमध्ये माझी आई माझी पार्टनर आहे. फक्त माझ्याच नाही तर माझ्या वडिलांच्या आणि भावाच्या अकाऊंटमध्ये देखील माझी आई पार्टनर आहे.

घर घेण्यापासून ते घर खरेदीपर्यंत सर्व ठिकाणी आईचं नाव आहे. माझा माझ्यावरच विश्वासच नाही. मी माझ्या नावावर काही घेत नाही. मी भविष्यात माझ्या प्रॉपर्टीमधील 50 टक्के कोणालाही देऊ इच्छित नाही. मी त्यांना सांगितलं आहे की माझ्या प्रॉपर्टीचा 50 टक्के हिस्सा हा तुमच्याकडे असलेला बरा. कारण काही घडलंच तर मी तो हिस्सा गमावणार नाही. पांड्याने ही मुलाखत 2018 मध्ये दिली होती.

हार्दिक पांड्याने सर्बियाच्या नताशा स्टॅन्कोविचशी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वीच नताशा गर्भवती होती. तिने लग्नानंतर काही महिन्यातच अगस्तला जन्म दिला.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : नवीन वर्षात शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 350 अंकांनी वाढला; TVS Motors चर्चेत; कोणते शेअर्स वाढले?

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार

Karnataka Election Survey : भारतातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष, ईव्हीएमवर लोकांचा विश्वास वाढला; सरकारच्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून स्पष्ट

Srirampur Crime: बंटी जहागीरदार हत्या प्रकरण! दोन मारेकऱ्यांना समृद्धी महामार्गावर बेड्या; थरारक घटना अन् काय घडलं?

Gold Rate Today : नववर्षात सोनं-चांदी चमकली! चांदी ४ हजारांनी महाग; काय आहे तुमच्या शहरातील आजचे भाव?

SCROLL FOR NEXT