Hardik Pandya India squad for Sri Lanka tour sakal
Cricket

Hardik Pandya : 'मेहनत वाया नाही गेली...' कर्णधारपदाच्या वादात हार्दिक पांड्याची 'ती' पोस्ट व्हायरल

India squad announcement for Sri Lanka tour : रोहित शर्माच्या टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्तीनंतर हार्दिक पांड्या या फॉरमॅटमध्ये भारताचा पुढचा कर्णधार म्हणून विचार केला जात होता, पण तसे होताना दिसत नाही.

Kiran Mahanavar

Hardik Pandya Latest Post : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 27 जुलैपासून सुरू होत आहे, ज्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून टी-20 संघाच्या कर्णधाराबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेसोबतच्या टी-20 मालिकेत हार्दिकच्या जागी सूर्यकुमार यादव कर्णधार होऊ शकतो. मात्र, या कर्णधारपदाच्या वादा दरम्यान पांड्याने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली आहे.

हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये उपकर्णधार होता आणि रोहित शर्मानंतर तो टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसेल अशी अपेक्षा होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक बनलेला गौतम गंभीरची कर्णधार म्हणून पहिली पसंती सूर्यकुमार यादव आहे. गंभीर आणि संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सूर्याला 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत संघाचा कर्णधार बनवू इच्छित आहेत.

बुधवारी हार्दिक पांड्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये दोन फोटोंचा कोलाज दिसत आहे. पहिल्या फोटोत पांड्या नॅशनल क्रिकेट अकादमीत दिसतोय, तर दुसरा फोटो सध्याचा आहे.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये पांड्याने लिहिले की, 2023 च्या वर्ल्ड कपमधील दुखापतींनंतर हा प्रवास कठीण होता, परंतु टी-20 वर्ल्ड कपमधील विजयाने हे प्रयत्न सार्थकी लागले आहे. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कराल, तोपर्यंत तुम्हाला फळ मिळेल. मेहनत वाया जात नाही. आपण सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न करूया आणि आपल्या फिटनेसवर काम करूया.

एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 दरम्यान बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला काही महिने संघाबाहेर राहावे लागले होते. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पांड्याकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या, ज्या त्याने पूर्ण केल्या. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि भारताला दुसऱ्यांदा टी-20 चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT