T20 World Cup Umpires and Match Referees Sakal
Cricket

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

T20 World Cup Umpires: आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी अंपायर आणि मॅच रेफ्रींची निवड केली आहे.

Pranali Kodre

T20 World Cup Umpires and Match Referees: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणारी ही स्पर्धा 29 जूनपर्यंत चालणार असून 55 सामने खेळवले जाणार आहेत. टी20 वर्ल्ड कपच हे नववे पर्व आहे.

दरम्यान, आता ही स्पर्धा सुरू होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असताना आयसीसीने पंच आणि सामनाधिकाऱ्यांची (Umpires and Match Referees) यादी जाहीर केली आहे. आयसीसीने सध्या पहिल्या फेरीसाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यामध्ये 20 पंच आणि 6 सामनाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या 26 जणांच्या यादीत जयरमन मदनगोपाल, नितीन मेनन, जवागल श्रीनाथ अशा भारतीयांचाही समावेश आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी सर्वोत्तम पंच म्हणून पुरस्कार जिंकणाऱ्या रिचर्ड इलिंगवर्थ यांचाही समावेश आहे.

त्याचबरोबर 2022 मध्ये टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहिलेल्या कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, पॉल रायफल यांचीही यंदा देखील निवड झाली आहे. तसेच त्या अंतिम सामन्यात सामनाधिकारी असलेल्या रंजन मुदुगले आणि जेफ क्रो यांचीही निवड झाली आहे.

क्रो हे सर्वाधिक 175 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत सामनाधिकारी म्हणून काम करणारे सामनाधिकारी आहेत. तसेच अँड्र्यू पायक्रॉफ्टही 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत काम करणारे सामनाधिकारी यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बनतील, त्यासाठी ते एकच सामना दूर आहेत.

टी20 वर्ल्ड कपमधील पहिल्या फेरीसाठी पंच आणि सामनाधिकारी

  • पंच - ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, अल्लाउद्दिन पालेकर, रिचर्ड केटलबरो, जयरमन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, अहसान रझा, रशीद रियाझ, पॉल रायफेल, लँगटन रुसेरे, शाहिद सियाकत, रोडनी टकर, ॲलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.

  • सामनाधिकारी - डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ

20 संघात रंगणार स्पर्धा

दरम्यान, यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स असे 20 संघ सहभागी होणार आहेत.

दरम्यान, या 20 संघांची चार गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिल्या फेरीनंतर चार गटांमधून प्रत्येकी 2 संघ सुपर 8 फेरीत जातील. या आठ संघांचीही दोन गटात विभागणी होईल. त्यातून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात खेळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

SCROLL FOR NEXT