T20 WC 2024 esakal
Cricket

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

अनिरुद्ध संकपाळ

T20 WC 2024 : आयपीएल 2024 मधून दोन संघ आधीत इलिमिनेट झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांचा पत्ता कट झाला आहे. या दोन संघात भारताचे टी 20 वर्ल्डकप खेळणारे काही खेळाडू आहेत. त्यांना बीसीसीआयने मोठा दिलासा दिला आहे. भारतीय संघ 24 मे रोजी युएसएला रवाना होणार आहे. त्यापूर्वी चार दिवस आधी जे संघ आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये इलिमिनेट झाले आहेत त्या संघातील खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितलं की भारतीय संघातील काही खेळाडू हे 24 मे रोजी युएसएला रवाना होतील. त्यानंतर उर्वरित खेळाडू हे आयपीएलची 26 मे ची फायनल झाल्यावर रवाना होतील. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या खेळाडूंमध्ये मुंबई इंडियन्सचे चार खेळाडू आहेत. यात कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवचा समावेश आहे. तर पंजाब किंग्जच्या संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा या पहिल्या टप्प्यात रवाना होणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश आहे.

टी 20 वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT