ICC T20 World Cup 2024 Monank Patel news in marathi  sakal
Cricket

T20 World Cup 2024 : देश सोडून गेलेला गुजराती खेळाडू बनला अमेरिकन क्रिकेट संघाचा कर्णधार! वर्ल्डकप मध्ये करणार नेतृत्व

ICC T20 World Cup 2024 Monank Patel : यंदा टी-20 वर्ल्डकपचा थरार या वर्षी जूनमध्ये रंगणार आहे.

Kiran Mahanavar

ICC T20 World Cup 2024 Monank Patel : यंदा टी-20 वर्ल्डकपचा थरार या वर्षी जूनमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जोरदार तयारी केली आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये एकूण 9 मैदानांवर टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्याचे वेळापत्रकही जाहीर झाले आहे.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये यावेळी एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना एक जून रोजी अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपची उपांत्य फेरी 26 आणि 27 जून रोजी खेळवली जाईल. पहिल्यांदाच अमेरिकन क्रिकेट संघही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. अमेरिकन क्रिकेट संघाचा कर्णधार हा भारतीय वंशाचा मोनांक पटेल आहे.

कोण आहेत मोनांक पटेल?

भारतातील गुजरात राज्याचा राहणारा मोनांक पटेल टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. 2010 मध्ये मोनांकला अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळाले. त्यानंतर 2016 पासून पटेल अमेरिकेत राहू लागला. पटेल 2018 पासून अमेरिकेसाठी क्रिकेट खेळत आहे.

त्याच वर्षी, तो आयसीसी वर्ल्ड टी-20 अमेरिका क्वालिफायर स्पर्धेसाठी क्रिकेट खेळला आणि या दरम्यान त्याने सहा सामन्यांमध्ये एकूण 208 धावा केल्या. पटेल 2021 पासून अमेरिकेच्या संघाचे कर्णधार आहेत, आणि या वर्षीही ते अमेरिकेच्या संघाचे कर्णधारपद भूषवताना दिसणार आहेत.

यासोबत भारत सोडून अमेरिकेत गेलेल्या क्रिकेटपटू उन्मुक्त चंदचे टी-२० वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंग पावल्याचे दिसत आहे. या वर्ल्डकपपूर्वी अमेरिका कॅनडासोबत टी-२० मालिका खेळणार आहे. यूएस क्रिकेट बोर्डाने यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. उन्मुक्त चंदचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. टी-२० विश्वचषक यंदा जूनमध्ये खेळवला जाणार आहे.

यूएस संघ : मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स (उपकर्णधार), अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, गजानंद सिंग, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, शेडली व्हॅन शाल्कविक , स्टीव्हन टेलर, उस्मान रफिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT