Team India Sakal
Cricket

IND vs BAN, 1st Test: बुमराहच्या ४०० विकेट्स पूर्ण अन् बांगलादेशचा डावही अवघ्या १४९ धावांत गुंडाळला, भारताकडे मोठी आघाडी

Jasprit Bumrah 400 International Wickets: भारतीय संघाने बांगलादेशला अवघ्या १४९ धावांत ऑलआऊट करत धावांची आघाडी घेतली. यादरम्यान जसप्रीत बुमराहने एक मोठा विक्रमही केला.

Pranali Kodre

India vs Bangladesh 1st Test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी बांगलादेश संघाचा पहिला डाव ४७.१ षटकात १४९ धावांवर संपला. त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली आहे.

खरंतर भारताचा डाव दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ३७६ धावांवर संपला. त्यानंतर बांगलादेश संघ पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने त्यांना मोठा धक्का दिला. बुमराहने सलामीवीर शादमन इस्लामला २ धावांवरच त्रिफळाचीत केले.

त्यानंतर झाकिर हसन आणि नजमुल हुसैन शांतोने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण आकाश दीपने ९ व्या षटकात पहिल्याच दोन चेंडूवर झाकिर हसन (३) आणि मोमिनुल हक (०) यांना लागोपाठ त्रिफळाचीत करत माघारी धाडले.

बांगलादेशचा कर्णधार शांतोही फार काही खास करू शकला नाही. त्याला मोहम्मद सिराजने विराट कोहलीच्या हातून २० धावांवर झेलबाद केले. १३ व्या षटकात मुशफिकुर रहिमलाही जसप्रीत बुमराहने ८ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे एक वेळ बांगलादेशची अवस्था ५ बाद ४० धावा अशी झाली होती.

परंतु नंतर शाकिब अल हसन आणि लिटन दास यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची भागीदारी चांगली होत होती. पण अखेर रविंद्र जडेजाने भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने २९ व्या षटकात लिटन दासला जडेजाने २२ धावांवर बाद केले, तर शाकिबलाही त्याने ३२ धावांवर बाद केले.

त्यामुळे बांगलादेश संघ आणखी अडचणीत सापडला. त्यातच जसप्रीत बुमराहने हसन मेहमुदलाही ९ धावांवर बाद केले आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० वी विकेट पूर्ण केली. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० विकेट्स पूर्ण करणारा १० वा भारतीय खेळाडू ठरला.

अखेरीस मेहदी हसन मिराज आणि तस्किन अहमद हे भागीदारी करण्याचा प्रयत्न करत होते. पण बुमराहनेच तस्किन अहमदला ११ धावांवर अफलातून यॉर्कर टाकून त्रिफळाचीत केले. अखेर मोहम्मद सिराजने ४८ व्या षटकात नाहिद राणाला ११ धावांवर बाद करत बांगलादेशचा डाव संपवला.

तत्पुर्वी, भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ६ बाद ३३९ धावांपासून पुढे खेळायला सुरूवात केली होती. त्यावेळी रविंद्र जडेजा ८६ धावांवर आणि आर अश्विन १०२ धावांवर नाबाद होता. परंतु, जडेजा दुसऱ्या दिवशी जडेजा ८६ धावांवरच बाद झाला. त्यानंतर आकाश दीपने १७ धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

अखेरीस अश्विन आणि जसप्रीत बुमराह बाद झाल्याने भारताचा डाव ९१.२ षटकात ३७६ धावांवर संपुष्टात आला. अश्विनने १३३ चेंडूत ११ चौकार आण २ षटकारांसह ११३ धावा केल्या. बुमराह ७ धावांवर बाद झाला. तत्पुर्वी पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालनेही भारतासाठी ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

बांगलादेशकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात हसन मेहमुदने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर तस्किन अहमदने ३ विकेट्स घेतल्या, तर नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT