Rishabh Pant century esakal
Cricket

IND vs BAN 1st Test : 634 दिवसांनी कसोटी खेळला अन् Rishabh Pant ने झळकावले शतक; महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

India vs Bangladesh 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत चारशेपार आघाडी घेतली आहे. शुभमन गिल व ऋषभ पंत यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावताना चौथ्या विकेटसाठी शतकीपार भागीदारी पूर्ण केली. 634 दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या ऋषभने शतक झळकावून आपला दबदबा दाखवून दिला.

Swadesh Ghanekar

Rishabh Pant century India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : शुभमन गिल आणि ऋषभ पंत ( Rishabh Pant) या जोडीने भारताला फ्रंट सीटवर बसवले आहे. ६३४ दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या ऋषभने अविश्वसनीय फटकेबाजी करून शतक झळकावले. या शतकासह ऋषभने MS Dhoni च्या विक्रमाशी बरोबरी केली. ऋषभ यापूर्वी कसोटीत ९० ते ९९ च्या दरम्यान ७ वेळा बाद झाला होता आणि त्यामुळे चाहते चिंतेत होते. पण, ऋषभने खणखणीत फटकेबाजी करून शुभमनच्या आधी शतक पूर्ण केले. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर मैदानावर परतलेला ऋषभची ही पहिलीच कसोटी मॅच होती आणि त्यात त्याने शतक झळकावले.

भारताच्या ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. भारतासाठी पहिल्या डावात आर अश्विन ( ११३) आणि रवींद्र जडेजा ( ८६) यांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावा जोडल्या. यशस्वी जैस्वाल ( ५६) व ऋषभ पंत ( ३९) यांनी संघाला आधार दिला होता. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला. जसप्रीतने ४, सिराज, आकाश व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

दुसऱ्या डावातही रोहित शर्मा ( ५), विराट कोहली (१७) काही खास करू शकले नाही. यशस्वी १० धावा करून माघारी परतल्याने भारताला ६७ धावांत ३ धक्के बसले होते. पण, शुभमन गिल व ऋषभ पंत यांनी डाव सावरला. तिसऱ्या दिवशी गिलने दोन खणखणीत षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. कसोटीच्या दुसऱ्या डावातील ही त्याची सलग चौथी 50+ धावांची खेळी ठरली. ऋषभनेही त्याचा ट्रेड मार्क वन हँड सिक्स खेचून अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी २७.४ षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर ऋषभने गिअर बदलला आणि शुभमनच्या आधी शतक पूर्ण केले.

महेंद्रसिंग धोनीने १४४ इनिंग्जमध्ये सहा शतकं झळकावली आहेत. ऋषभने कसोटीत ५८ इनिंग्जमध्ये सहा शतकांचा पराक्रम केला. ऋषभने १२४ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. पण, त्याला आणखी मोठी खेळी करता आली नाही. १२८ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारांसह तो १०९ धावांवर माघारी परतला. शुभमनसह त्याची २१७ चेंडूंत १६७ धावांची भागीदारीही संपुष्टात आली आणि भारताला २३४ धावांवर चौथा धक्का बसला. भारताकडे आता ४६१ धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT