Rishabh Pant  esakal
Cricket

IND vs BAN 1st Test : बॅटीची पूजा अन्...! Rishabh Pant फलंदाजीला येण्यापूर्वी बघा काय करतो; IPL टीमसह चाहतेही फिदा Video Viral

India vs Bangladesh 1st Test Live : भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऋषभ पंत व शुभमन गिल यांच्या शतकाने कसोटीचा तिसरा दिवस गाजवला.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 1st Test Updates Marathi : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाने आपली पकड मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताने पाहुण्या बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावातील आर अश्विनच्या शतकाने आधार दिल्यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत व शुभमन गिल यांची बॅट तळपली. दोघांनी शतकी खेळी केली आणि रोहित शर्माने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला.

भारताच्या पहिल्या डावातील ३७६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांवर गुंडाळला गेला. भारताची दुसऱ्या डावातही सुरुवात काही खास झाली नाही. पण, ऋषभ व शुभमन या जोडीने २१७ चेंडूंत १६७ धावांची भागीदारी केली. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भयंकर अपघातानंतर ऋषभने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. ६३४ दिवसानंतर तो पहिलीच कसोटी खेळायला मैदानावर उतरला आणि त्या 'कसोटी'त तो खरा उतरला.

ऋषभने कसोटीतील सहावे शतक पूर्ण करताना महेंद्रसिंग धोनीच्या सहा कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऋषभने कसोटीत ५८ इनिंग्जमध्ये सहा शतकांचा पराक्रम केला. ऋषभ १२८ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारांसह तो १०९ धावांवर माघारी परतला. भारताला २३४ धावांवर चौथा धक्का बसला. शुभमनने १७६ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांसह ११९ धावांची नाबाद खेळी केली. भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित करून बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले.

शतकी खेळीनंतर ऋषभचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यात तो फलंदाजीला येण्यापूर्वी बॅटला नमस्कार करताना दिसत आहे. चाहते त्याचं कौतुक करत आहेत. आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सनेही कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रजांच्या नगरीत आजपासून चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला होणार सुरुवात

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उकाडा वाढणार; मार्च उष्ण ते अतिउष्ण राहण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT