IND vs BAN 2nd Test esakal
Cricket

Captain Rohit Sharma : रोहित शर्माने धोनीची परंपरा कायम राखली, विजयाची ट्रॉफी दिली युवकांच्या हाती अन्... Video Viral

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने कानपूर कसोटी जिंकून बांगलादेशविरुद्धची मालिका २-० ने जिंकली.

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test : भारतीय संघाने कानपूर कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थानावरील पकड आणखी मजबूत केली आहे. कानपूर कसोटीचे अडीच दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतरही कॅप्टन रोहित शर्माने रणनीती आखली. सहकाऱ्यांनीही त्याची योग्य अंमलबजावणी करताना अशक्य वाटणारा विजय मिळवला.

कसोटीचा पहिला दिवस ३५ षटकांचा झाला.. त्यानंतर दुसरा व तिसरा दिवस पावसामुळे एकही चेंडू न पडता वाया गेला. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी योग्य मारा करून बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात भारताने झटपट ९ बाद २८५ धावा करून डाव घोषित केला आणि ५२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव १४६ धावांवर गुंडाळला गेला. टीम इंडियाने १७.२ षटकांत ३ बाद ९८ धावा करून विजयाची नोंद केली.

भारतीय संघ २०१३ पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका पराभूत झालेला नाही आणि हा त्यांचा १८ वा कसोटी मालिका विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९९४ ते २००० व २००४ ते २००८ या कालावधीत सलग १० कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. IND vs BAN कसोटीत अश्विनने ११ विकेट्स घेतल्या आणि यशस्वी जैस्वालने दोन्ही डावांत ( ७२ व ५१) अर्धशतक झळकावले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अश्विनला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या हस्ते कर्णधार रोहितला ट्रॉफी दिली गेली. त्याने MS Dhoni ने सुरू केलेली परंपरा कायम राखताना ट्रॉफी आकाश दीपच्या हाती सोपवली आणि स्वतः कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. रोहितच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT