R Ashwin  esakal
Cricket

IND vs BAN 2nd Test : Ash Anna! आर अश्विनने इतिहास रचला, आशियात असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला

India vs Bangladesh 2nd Test : भारत-बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे

Swadesh Ghanekar

India vs Bangladesh 2nd Test Marathi Updates : भारत-बांगलादेश यांच्यातल्या कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. आकाश दीपच्या ( Akash Deep) दोन विकेट्सने पहिले सत्र गाजवले आणि लंच ब्रेकनंतर अॅश अण्णा आपला आर अश्विन ( R Ashwin) याने इतिहास घडवला. त्याने ब्रेकनंतर बांगलादेशला मोठा धक्का दिला.

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ९व्या षटकात आकाश दीपने बांगलादेशला पहिला धक्का दिला. यशस्वी जैस्वालने चौथ्या स्लिपला जाकिर हसनचा ( ०) सुरेख झेल टिपला. आकाशने त्याच्या पुढच्या षटकात शादमन इस्लामला ( २४) पायचीत पकडले. त्यानंतर मोमिनूल हक व कर्णधार नजमूल होसैन शांतो यांनी बांगलादेशचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

लंच ब्रेकनंतर अश्विनने बांगलादेशची सेट जोडी तोडली. शांतोला त्याने ३१ धावांवर पायचीत केले. २००० सालानंतर कसोटीत सर्वाधिक LBW विकेट घेण्याचा विक्रम अश्विनच्या ( ११३) नावावर आहे. रंगना हेरथ ( १०८) व स्टुअर्ट ब्रॉड ( १०१) यांनाच फक्त अश्विनच्या जवळ येता आले आहे. शांतोच्या विकेटने अश्विनच्या नावावर मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. आशियाई खंडात कसोटीत सर्वाधिक कसोटी विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये आर अश्विनने अव्वल स्थान पटकावले आहे. अश्विनची ही ४२० वी विकेट आहे आणि त्याने अनिल कुंबळेला ( ४१९) मागे टाकले आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरण ( ६१२) या विक्रमात आघाडीवर आहे.

दरम्यान, कानपूरला सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान बांगलादेशच्या सुपर फॅनला मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. पण, उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने हे वृत्त फेटाळले आहे आणि डिहायड्रेशनमुळे फॅन चक्कर येऊन पडल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

Pune Cyber Crime : लग्नाचे आमिष दाखवून पुण्यात ४३ वर्षीय महिलेला २६ लाखांचा गंडा; येरवड्यात गुन्हा दाखल!

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

SCROLL FOR NEXT