IND vs ENG 3rd Test Ashwin to rejoin Indian team in Rajkot news in marathi  
Cricket

R Ashwin Ind vs Eng : BCCI ची मोठी घोषणा! अश्विनची राजकोट कसोटी ताफ्यात पुन्हा एन्ट्री

R Ashwin to rejoin Indian team : टीम इंडिया सध्या राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टार फिरकी गोलंदाज आर.अश्विन सामन्याबाहेर होता पण...

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : टीम इंडिया सध्या राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टार फिरकी गोलंदाज आर.अश्विन सामन्याबाहेर होता. कौटुंबिक वैद्यकीय कारणामुळे अश्विनने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. पण आता त्याच्या परतल्यावर एक मोठे अपडेट समोर आले आहे.

आर अश्विन इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी राजकोटमध्ये भारतीय संघात सामील होण्यासाठी परतत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ तो पूर्णपणे खेळू शकला नाही. बीसीसीआयने अपडेट दिले आहे की, तो खेळाच्या चौथ्या दिवशीच संघात सामील होईल.

रविचंद्रन अश्विनचे ​​पुनरागमन ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 1 बळी घेत कसोटी क्रिकेटमधील 500 बळी पूर्ण केले. तो भारतासाठी सर्वात वेगवान 500 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 98 कसोटी सामन्यांमध्ये 500 बळी घेतले आहेत. ज्यामध्ये 34 वेळा 5 विकेट्सचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Accident: ट्रॅव्हल्सचा उघडा दरवाजा आला काळ बनून! दर्शनावरून परतताना भीषण अपघात; दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू

Mundhwa Land Scam : जंगम मालमत्ता दाखविण्याचा प्रकार, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; सह दुय्यम निबंधकांकडून अधिकाराचा गैरवापर

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Mundhwa Land Scam : 'मुंढवा' प्रकरणातून बावधनपर्यंत धागेदोरे! सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या सर्व व्यवहारांची तपासणी

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

SCROLL FOR NEXT