Ind vs Eng 3rd Test Dhruv Jurel likely Team India debut marathi news sakal
Cricket

Ind vs Eng : ठरलं तर मग...! 'हा' खेळाडू करणार राजकोट कसोटीत करणार पदार्पण, BCCI च्या 'त्या' व्हिडिओमुळे शिक्कामोर्तब

India vs England 3rd Test : राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे किती खेळाडू पदार्पण करतील. हा प्रश्न काही काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

Kiran Mahanavar

India vs England 3rd Test : राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे किती खेळाडू पदार्पण करतील. हा प्रश्न काही काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. पण सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने एक व्हिडिओ सोशल मीडिया पोस्ट केला आहे. त्यामुळे कोणाता खेळाडू राजकोट कसोटीत पदार्पण करणार याची याची जवळपास पुष्टी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट विश्वात अशी चर्चा सुरू आहे की, आउट ऑफ फॉर्म केएस भरतला सतत संधी का दिली जात आहे. केएस भरतच्या जागी ध्रुव जुरेलला संधी का मिळत नाही? पण बीसीसीआयचा या व्हिडिओमुळे यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल तिसरा कसोटी सामना खेळू शकतो याचेही संकेत मिळाले आहेत.

दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीही असाच वाद सुरू होता. त्यानंतर सर्फराज खान आणि रजत पाटीदार यांच्यात कोणाला पहिल्यांदा पदार्पणाची संधी द्यायची यावर वाद सुरू झाला. आठवडाभर ही चर्चा सुरू राहिली पण बीसीसीआयकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही.

त्यानंतर दुसरा कसोटी सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने रजत पाटीदारचा व्हिडिओ जारी केला. दुसऱ्या दिवशी त्याला पदार्पणाची संधीही मिळाली. 14 फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने जारी केलेला व्हिडिओ देखील असाच एक संकेत म्हणून पाहिला जात आहे. आणि ध्रुव जुरेलचे चाहते देखील त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचे अभिनंदन करत आहेत.

यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अशा स्थितीत तिसरा कसोटी सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. सर्फराज खानही तिसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण करू शकतो. ध्रुव जुरेलच्या पदार्पणाचे संकेत देत बीसीसीआयने या सामन्यातून दोन भारतीय खेळाडू आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT