Suryakumar Yadav on Hardik Pandya sakal
Cricket

IND vs SL : हार्दिकची संघातील भूमिका काय? सूर्यकुमार यादवने स्पष्टच सांगितले, रोहितबाबत म्हणाला...

Suryakumar Yadav on Hardik Pandya IND vs SL -सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सकडून खेळताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळावे लागते, परंतु आता टीम इंडियात सूर्या कॅप्टन झाला आहे...

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka 1st T20I Suryakumar Yadav PC - सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या नव्या प्रवासाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. २७ जुलै रोजी भारत-श्रीलंका पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याकडे ( Hardik Pandya) कडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणे अपेक्षित होते, परंतु नवीन प्रशिक्षक गौतम गंभीरने ही जबाबदारी सूर्याच्या खांद्यावर टाकली. उद्या होणाऱ्या लढतीपूर्वी सूर्याने आज पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच मुद्यांवर स्पष्ट मत मांडले.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित, विराट कोहली व रवींद्र जडेजा या तीन सीनियर्सनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर संघात बरेच बदल पाहायला मिळाले. कर्णधारपद सूर्याकडे गेले, शुभमन गिल वन डे व ट्वेंटी-२० संघाचा उप कर्णधार म्हणून समोर आला... रियान परागला वन डे पदार्पणाची संधी मिळणार आहे. हार्दिकला कर्णधारपद न मिळाल्याने बरीच चर्चा रंगली आणि निवड समितीकडून त्याचे उत्तरही दिले गेले. आता मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखालील खेळणारा सूर्या टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे आणि हार्दिक त्याच्या हाताखाली खेळणार आहे.

सूर्यकुमारने स्पष्ट केली हार्दिकची संघातील भूमिका

भारतीय संघात स्थित्यंतर झाले आहे आणि सूर्याच्या नेतृत्वाखाली हार्दिक खेळणार आहे. काहींच्या मते याचे सूर्यावर दडपण नक्की असेल, परंतु यावर सूर्याने आपले मत व्यक्त केले. सूर्याची कर्णधार म्हणून घोषणा झाली त्यानंतरच्या पहिल्याच भेटीत हार्दिकने त्याला मिठी मारून सर्व वादांच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. आज सूर्याने हार्दिकबद्दल म्हटले की, हार्दिकची संघातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची भूमिका तिच आहे, जी आधी होती. तो संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.

रियान परागच्या निवडीवर...

या मालिकेसाठी रियान पराग याची झालेली निवड ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. IND vs ZIM मालिकेत रियानला फक्त २४ धावा करता आल्या आणि एकही विकेट घेतली नाही. तरी संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिली आणि त्यावर सूर्या म्हणाला की, रियान परागकडे X फॅक्टर आहे.

रोहितच्या पावलांवर पाऊल...

सूर्यकुमारला रोहितने जे यश भारताला मिळवून दिले आहे, तसेच यश मिळवून द्यायचे आहे. तो म्हणाला, या संघात फार काही बदल झालेला नाही. फक्त कर्णधार बदलला आहे. रोहित हा कॅप्टनपेक्षा चांगला नेता होता आणि त्याचीच पुनरावृत्ती मला करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026: नेपाळ-ओमान वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार! १९ संघ ठरले, आता उरली एक जागा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये टॉप लीडरसह तब्बल १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण?

Crime News: आधी १० श्वानांवर विषप्रयोग, नंतर ४ लोकांना संपवलं, दोन बहिणीच्या क्रूर कृत्यामागचं कारण ऐकून शहर हादरलं!

Ambegaon News : टाव्हरेवाडीत विषबाधेने १५ मेंढ्यांचा मृत्यू,, पशुवैद्यकांनी १५ मेंढ्या वाचवल्या

Latest Marathi News Live Update : अंत्यविधी कार्यक्रमात पिकअप घुसला; एक मयत, एक गंभीर

SCROLL FOR NEXT