Mohammed Siraj Injury India vs Sri Lanka 1st T20I sakal
Cricket

IND vs SL 1st T20I : ज्याची भीती होती, शेवटी तेच झालं... टीम इंडियाला मोठा धक्का! सूर्या अन् गंभीर टेन्शनमध्ये

Mohammed Siraj Injury India vs Sri Lanka T20 Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार आज शनिवार 27 जुलैपासून रंगणार आहे.

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा थरार आज शनिवार 27 जुलैपासून रंगणार आहे. टी-20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू पुन्हा मैदानात उतरतील. मात्र, या मालिकेपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सरावादरम्यान दुखापत झाली आहे.

सिराजच्या उजव्या पायाला दुखापत झाली. सिराज या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पहिला टी-20 सामना कधी अन् कुठे होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा पहिला टी-20 सामना शनिवार, 27 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हा सामना पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टी-20 मालिकेतील तीनही सामने केवळ पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका T20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये टीम इंडियाने 19 जिंकले, तर श्रीलंकेला फक्त 9 जिंकता आले. दोघांमधील सामना अनिर्णित राहिला.

यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका जानेवारी 2023 मध्ये खेळवण्यात आली होती. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. तरीही भारताने घरच्या भूमीवर मालिका खेळली. यावेळी ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार आहे.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, रायन पराग, खलील अहमद, शिवम दुबे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT