India vs Zimbabwe 3rd T20I sakal
Cricket

Ind vs Zim: शेवटच्या 3 टी-20 सामन्यांसाठी टीम इंडियात होणार बदल! 'हे' खेळाडू न खेळता होणार बाहेर?

India vs Zimbabwe T20I Series: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत.

Kiran Mahanavar

India vs Zimbabwe 3rd T20I : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. मालिकेतील पहिला सामना जिंकून झिम्बाब्वेने सर्वांनाच चकित केले, मात्र भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत झिम्बाब्वेचा पराभव केला. आता मालिकेत तीन सामने बाकी आहेत. दरम्यान, उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत.

झिम्बाब्वे मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या संघात टी-20 वर्ल्ड कप संघात जे खेळाडू होते त्यांचाही त्यात समावेश होता. मात्र बार्बाडोसमधील खराब हवामानामुळे खेळाडूंना येण्यास उशीर झाल्याने त्यांच्या जागी दुसरे तीन खेळाडू पाठवले. यामध्ये जितेश शर्मा, साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांच्या नावांचा समावेश होता.

साई सुदर्शनला सामना खेळण्याची संधी मिळाली, मात्र तो फलंदाजीला येऊ शकला नाही. तर जितेश आणि हर्षित यांना प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवता आले नाही. आता संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे झिम्बाब्वेला पोहोचले आहेत.

आता झिम्बाब्वेला गेलेले नवे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकतील का, हाही प्रश्न आहे. कर्णधार शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा ओपनिंग करत आहेत, गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत, अशा स्थितीत यशस्वी जैस्वालला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे, पण जुरेल ध्रुवच्या जागी संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रवेश मिळू शकतो हे निश्चित आहे. शिवम दुबेबद्दल बोलायचे झाले तर त्याची एंट्री साई सुदर्शनच्या जागी होऊ शकते. त्याच्या आगमनाने शुभमन गिलला गोलंदाजीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ:

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT