Shreyas Iyer Sakal
Cricket

Shreyas Iyer: 'बॅट माझ्या हातात...' BCCI ने वार्षिक करारातून वगळ्याबद्दल श्रेयस अय्यरनं सोडलं मौन

Shreyas Iyer: बीसीसीआयने श्रेयस अय्यरला 2023-24 वार्षिक करारातून वगळले आहे, याबद्दल आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Shreyas Iyer News: भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरसाठी गेला हंगाम संमिश्र राहिला. त्याने 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी केली, पण त्याला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतीय संघातून वगळण्यात आले. त्यानंतर त्याला पाठीच्या दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीतील उपांत्य पूर्व फेरीतील मुंबईच्या सामन्याला मुकावे लागले.

याचदरम्यान, त्याला बीसीसीआयकडूनही 2023-24 वार्षिक केंद्रिय करारातून वगळण्यात आले. अशी चर्चा होती की तो रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व सामन्यात खेळला नसल्याने त्याला वार्षिक करार दिलेला नाही.

या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. याबद्दल आता श्रेयस अय्यरनेच मौन सोडले आहे. त्याने म्हटले आहे की संवादाची कमी झाल्याने अशा गोष्टी घडल्या, पण फलंदाजी करणे त्याच्या हातात आहे.

तो त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हणाला, 'माझ्यासाठी वर्ल्ड कप चांगला गेला होता. मला त्यानंतर थोडी विश्रांती घ्यायची होती. माझ्या शरीरावर काम करायचे होते आणि काही विभाग मजबूत करायचे होते. पण योग्य संवाद न साधला गेल्याने काही निर्णय माझ्या बाजूने लागले नाहीत.'

'मात्र, शेवटी माझ्या हातात फक्त बॅट आहे, जी नेहमीच माझ्या हातात असेल. मी कशी कामगिरी करणार आणि स्पर्धा जिंकणार, हे माझ्या हातात आहे. मी विचार केलेला की रणजी ट्रॉफी आणि आयपीएल जिंकणे हे भूतकाळात जे काही झाले आहे त्यासाठी सर्वात चांगले उत्तर असेल.

'मी कृतज्ञ आहे की सर्वकाही योग्य झाले. जे आत्ता आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला भविष्यातही अनेक ट्रॉफी जिंकायच्या आहेत.'

दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मे महिन्याच्या अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या स्पर्धेत त्याने 14 सामन्यांत 351 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT