Mumbai Indians | IPL Sakal
Cricket

Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

Mumbai Indians Coach in IPL 2025: मुंबई इंडियन्स संघात द्रविडबरोबर काम केलेल्या दिग्गजाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

Mumbai Indians News: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा भारतीय संघाने जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्याच्याबरोबरील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे या स्पर्धेनंतर आता हे सदस्य काय करणार, ही चर्चा होती.

पण टी दिलीप यांना बीसीसीआयने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून कायम केले. तसेच काही दिवसांपूर्वीच द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्याच्यासह विक्रम राठोड हे देखील राजस्थानचे फलंदाजी प्रशिक्षक झाले. आता पारस म्हाम्ब्रे हे देखील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार म्हाम्ब्रे मुंबई इंडियन्स संघाशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. त्यांनी यापूर्वीही मुंबई इंडियन्सबरोबर काम केले आहे. दरम्यान, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

पारस म्हाब्रे यांच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी गेल्या काही वर्षात शानदार कामगिरी केली होती. त्यांना प्रशिक्षण क्षेत्रातील चांगला अनुभवही आहे. तसेच त्यांनी भारताकडून २ कसोटी आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. त्यांचे आंतरराष्ट्रीय करियर मोठे राहिले नसले तरी त्यांची मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळताना चांगली कामगिरी झाली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स म्हाब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. मात्र सध्या लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यामुळे जर म्हाब्रे यांना ही जबाबदारी दिली, तर मलिंगाची जबाबदारी बदलणार की त्याची मुंबई इंडियन्सबरोबरची साथ सुटणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सध्या मुंबई इंडियन्सच्या जगभरातील सिस्टर फ्रँचायझी एमआय एमीरेट्स, एमआय केपटाऊन, एमआय न्यूयॉर्क या संघांच्या प्रशिक्षकांच्या प्रमुखाची जबाबदारी माहेला जयवर्धनेकडे आहे. त्यामुळे तो आता याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, येत्या काही दिवसात आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव होईल, त्यामुळे त्याआधी गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आयपीएल लिलाव यंदा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या लिलावापूर्वी प्रत्येक संघाला ६ खेळाडूंना कायम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान हा लिलाव सिंगापूरला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT