Team India | T20 World Cup 2024 Sakal
Cricket

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल; BCCI ने ज्याच्यावर बंदी घातलेली, त्यालाच दिली संधी

India Squad for Zimbabwe Tour: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झालेल्या भारतीय संघात तीन मोठे बदल झाले आहेत.

Pranali Kodre

India Squad for Zimbabwe Tour: टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा संपल्यानंतर आता युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे.

या मालिकेसाठी भारताच्या निवड समितीने संघ घोषित केला आहे. मात्र, आता या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या दोन सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांना भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

त्यांना संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचे बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.

सॅमसन, दुबे आणि जैस्वाल हे टी20 वर्ल्ड कप 2024 विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. सध्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याने भारतीय संघ तिथेच अडकला आहे.

त्यामुळे सॅमसन, जैस्वाल आणि दुबेही भारतीय संघाबरोबर बार्बाडोसमध्ये आहेत. ते आता आधी भारतात येतील आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातील शेवटच्या तीन टी20 सामन्यांसाठी रवाना होतील.

दरम्यान, यामुळे आता साई सुदर्शन आणि हर्षित राणा यांना आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी असणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हर्षित राणावर आयपीएल 2024 दरम्यान बीसीसीआयने शिस्तभंगाबद्दल कठोर कारवाई केली होती. त्याला एका सामन्यासाठी बंदीही घातली होती.

असा असेल झिम्बाब्वे दौरा

भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात 6 जुलैपासून टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सामने जुलै महिन्यातील दिनांक 6, 7, 10, 13 आणि 14 या दिवशी टी20 सामने होणार आहेत. हे सर्व सामने हरारेला होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता चालू होतील.

पहिल्या दोन टी20 सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ -

शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षित राणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

ITI Students: आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता वैदिक संस्कार अभ्यासक्रम; नेमकं काय शिकायला मिळणार?

साईबाबांनी स्वप्नात दर्शन देताच दूर झाला बॉलिवूड अभिनेत्रीचा रोग ! 'या' दिग्दर्शकाच्या होती प्रेमात

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

SCROLL FOR NEXT