Abhishek Sharma Ruturaj Gaikwad X/BCCI
Cricket

IND vs ZIM, 2nd T20I: अभिषेकचं शतक, तर ऋतुराजचीही तुफानी फटकेबाजी; भारताने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकल्या विश्वविक्रमी धावा

India vs Zimbabwe: भारतीय संघाने अभिषेक शर्माचे शतक आणि ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर दुसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेसमोर धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs Zimbabwe, T20I: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी२० मालिकेचा दुसरा सामना हरारे येथे रविवारी (७ जुलै) होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे समोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतीय संघाने २० षटकात २ बाद २३४ धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरुद्ध २ बाद २२९ धावा केल्या होत्या.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दुसऱ्याच षटकात कर्णधार शुभमन गिल २ धावांवर बाद झाला. मात्र, यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी जमली. एकीकडून अभिषेक आक्रमक खेळत असतानाच ऋतुराजने खेळपट्टीवर जम बसवण्यासाठी वेळ घेतला. मात्र, त्यानेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करायला सुरुवात केली.

या दोघांनीही शतकी भागीदारी केली. आक्रमक खेळणाऱ्या अभिषेकने १४ व्या षटकातच षटकार मारत शतक पूर्ण केले. मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकार मारताना १०० धावांची खेळी केली.

अभिषेक बाद झाल्यानंतर ऋतुराजची साथ देण्यासाठी रिंकु सिंग आला. या दोघांनीही फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. ऋतुराजनेही अर्धशतक पूर्ण केले. तसेच रिंकुने अखेरीस जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने विक्रमी धावसंख्या उभारली.

अखेरीस ऋतुराज ४७ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकारासह ७७ धावा करून नाबाद राहिला. तसेच रिंकुने २२ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले.

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनी आणि वेलिंग्टन मसकद्झा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

पहिल्या सामन्यात झालेला पराभव

झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी (६ जुलै) झालेल्या पहिल्या टी२० सामन्यांत भारताला १३ धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे झिम्बाब्वेने १-० अशी मालिकेत आघाडी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

SCROLL FOR NEXT