IND vs ENG 3rd Test Ashwin withdraws due to family emergency marathi news sakal
Cricket

Ind vs Eng : चालू सामन्यात टीम इंडियाला धक्का! R Ashwin तिसऱ्या कसोटीतून बाहेर, BCCIने सांगितले कारण

IND vs ENG 3rd Test Ashwin withdraws due to family emergency :

Kiran Mahanavar

IND vs ENG 3rd Test R Ashwin : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेणारा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यापुढे या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही.

कौटुंबिक कारणामुळे अश्विनने या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे.

अश्विनने दुसऱ्या दिवशी सलामीवीर जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी सामन्यात 500 बळी घेण्याचा पराक्रम केला. ही कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

जय शाह म्हणाले, 'कौटुंबिक कारणामुळे आर अश्विनला तत्काळ कसोटी संघातून बाहेर करण्यात आले आहे. या कठीण काळात भारतीय बोर्ड त्याच्यासोबत आहे. चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला बीसीसीआय सपोर्ट करते. खेळाडू आणि त्यांच्या प्रियजनांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. बोर्डाने अश्विन आणि त्याच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे. कारण तो सध्या या आव्हानात्मक काळातून जात आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियावर अश्विनच्या आईला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राजीव शुक्ला यांनी सांगितले की, अश्विन राजकोटहून चेन्नईला परतला आहे.

आर अश्विनच्या आधी स्टार फलंदाज विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. विराटही वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेचा भाग नाही. बीसीसीआय 37 वर्षीय आर अश्विनसोबत आहे. मंडळाने लोकांना अश्विनची गोपनीयता पाळण्याचे आवाहनही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT