IND vs SL 1st T20I suryakumar yadav Most six sakal
Cricket

IND vs SL 1st T20I - सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करणार; दिग्गजांना मागे टाकणार

India vs Sri Lanka T20I Suryakumar Yadav - भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर सोपवली गेली आहे.

Swadesh Ghanekar

India vs Sri Lanka 1st T20I Captain Suryakumar Yadav - भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना आज पल्लेकेले येथे होणार आहे. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव मैदानावर उतरणार आहे. त्याचवेळी भारतीय संघ प्रशिक्षक गंभीरच्या नेतृत्वाखाली नवीन पर्वाच्या सुरुवातीला सज्ज झाला आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादवला खास विक्रम करण्याची संधी असेल. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सूर्यला खुणावतोय.

सूर्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त आतापर्यंत १३३ षटकार ठोकले आहेत, तर दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेल १३४ षटकारांसह आघाडीवर आहे. इंग्लंडच्या जॉस बटलरने ट्वेंटी-२०त १३७ षटकार खेचून अव्वल स्थान पटकावले आहे. सूर्याला ट्वेंटी-२०तील हा विक्रम स्वतःच्या नावावर करण्यासाठी मालिकेत ५ षटकार खेचावे लागतील. आज त्याने दोन षटकार खेचले, तर तो ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकेल.

भारत वि. श्रीलंका ट्वेंटी-२० मालिका

२७ जुलै - पहिली T20 - सायंकाळी ७ वा. पासून

२८ जुलै - दुसरी T20 - सायंकाळी ७ वा. पासून

३० जुलै - तिसरी T20 - सायंकाळी ७ वा. पासून

वन डे मालिका

२ ऑगस्ट - पहिली वन डे - दुपारी २.३० वा. पासून

४ ऑगस्ट - दुसरी वन डे - दुपारी २.३० वा. पासून

७ ऑगस्ट - तिसरी वन डे - दुपारी २.३० वा. पासून

भारताची संभाव्य एकादश - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग/शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेची संभाव्य एकादश - पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ असलंका (क), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, मथिशा पाथिराना, बिनुरा फर्नांडो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT