India Womens Cricket Team Defeat Bangladesh Womens Cricket Team In 5th  esakal
Cricket

INDW vs BANW 5th T20I : भारतीय महिला संघाकडून बांगलादेशला व्हाईट वॉश; पाचव्या सामन्यातही दिली मात

अनिरुद्ध संकपाळ

India Women's Cricket Team Defeat Bangladesh Women's Cricket Team In 5th T20I : भारतीय महिला क्रिकेट संघाने आज बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा पाचव्या टी 20 सामन्यात 21 धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने पाच टी 20 सामन्यांची मालिका 5-0 अशी खिशात घालत बांगलादेश दौरा यशस्वी केला. पाचव्या सामन्यात राधा यादव प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. तर तिलाच प्लेअर ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार देण्यात आला.

पाचव्या सामन्यात प्रथम फंलदाजी करणाऱ्या भारतीय महिला संघाने 20 षटकात 5 बाद 156 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेशला 20 षटकात 6 बाद 135 धावाच करता आल्या. भारताकडून फलंदाजीत टॉप ऑर्डरने सांघिक कामगिरी केली. त्यानंतर राधा यादव आणि आशा शोभना यांनी भेदक मारा करत बांगलादेशला 135 धावात रोखलं.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 156 धावा केल्या. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने दमदार फलंदाजी केली. सलामीवीर स्मृती मानधनाने 25 चेंडूत 33, हेमलताने 28 चेंडूत 37 धावांची खेळी केली. त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने 24 चेंडूत 30 धावा केल्या. आपल्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रिचा घोषने तर 17 चेंडूत 28 धावा करत भारताला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. बांगलादेशकडून राबेया खान आणि निहीदा अक्तरने प्रेत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताचे 157 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने धक्के देत मोठी भागीदारी होऊ दिली नाही. भारताने बांगलादेशची अवस्था 5 बाद 52 धावा अशी केली होती. आता भारतीय संघ बांगलादेशचा संपूर्ण संघ स्वस्तात गुंडाळणार असं वाटत असतानाच रितू मोनी आणि शोरिफा खातून यांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची अर्धशतकी भागीदारी रचली.

मात्र आशा शोभनाने 33 चेंडूत 37 धावा करणाऱ्या रितू मोनीला बाद करत बांगलादेशची विजयाची आशा संपुष्टात आणली. आशा शोभनाने 2 तर राधा यादवने देखील 2 विकेट्स घेतल्या. शोरिफाने नाबाद 28 धावा केल्या. मात्र बांगलादेशला काही विजय मिळवता आला नाही.

भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यात विजय मिळवला. पहिल्या सामन्यात 44 धावांनी मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघ 19 धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशला 7 विकेट्सनी मात दिली. चौथ्या सामन्यात पुन्हा डकर्वथ लुईस नियमानुसार भारतीय संघ 56 धावांनी जिंकला. हा सामना पावसामुळे 14 षटकांचा झाला होता.

(Cricket Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT