Ind vs Eng Test Cricket  sakal
Cricket

Ind vs Eng Test Cricket : गमावण्यासाठी काहीच नाही : आकाशदीप

रांची आणि कोलकाताच्या मधोमध बिहारमध्ये माझे गाव आहे. २०१६ साली मी लेदर बॉलने खेळू लागलो. मला बंगाल क्रिकेट संघटनेने खूप मदत केली. छोट्या गावातून आल्याने मी काही तरी बनावे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. एकाच वर्षात माझे वडील आणि भाऊ देवाघरी गेले.

सकाळ वृत्तसेवा

रांची : रांची आणि कोलकाताच्या मधोमध बिहारमध्ये माझे गाव आहे. २०१६ साली मी लेदर बॉलने खेळू लागलो. मला बंगाल क्रिकेट संघटनेने खूप मदत केली. छोट्या गावातून आल्याने मी काही तरी बनावे, असे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. एकाच वर्षात माझे वडील आणि भाऊ देवाघरी गेले. त्यांच्या जीतेपणी मी त्यांचे स्वप्न साकारू शकलो नाही. त्यामुळे माझ्यासाठी गमावण्यासाठी काहीच नव्हते. कमावण्यासाठी बरेच काही होते. त्याच विचारांनी मी आज मैदानात उतरलो, अशी भावना पदार्पण करणाऱ्या आकाशदीपने व्यक्त केली.

आज मैदानात उतरताना कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षकांनी चांगला विश्वास दिला. मी नेहमी टाकतो तशीच गोलंदाजी कर इतकाच साधा सल्ला दिला. खेळाला सुरुवात झाली तेव्हा चेंडू टणक होता, विकेट ताजी होती म्हणून वेगवान गोलंदाजांना थोडी मदत झाली. झॅक क्रॉली माझ्या नो बॉलवर बाद झाला आणि नंतर त्याने सिराजला १८ धावा एका षटकात काढल्यावर मला वाईट वाटले. संघाला माझ्या चुकीचा फटका बसू नये अशी माझी धारणा होती. नंतर मला चांगला मारा करून तीन फलंदाजांना बाद करता आले, असे आकाशदीपने सांगितले.

रांचीची खेळपट्टी संथ झाली आहे. उरलेल्या तीन फलंदाजांना वेळेत बाद करून पहिल्या डावात चांगली फलंदाजी केली तर भारतीय संघ सामन्यात मुसंडी मारू शकतो, असे बोलून आकाशदीप ठसा उमटवून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार? CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब

Shocking News : आईने डोळ्यादेखत पाहिला मुलाचा मृत्यू ! नॅशनल बॉडी बिल्डरचा धक्कादायक अंत, घराबाहेर पडताना खाली कोसळला अन्...

Infertility Causes: आई-बाबा होण्यात येतोय अडथळा? 'ही' ३ कारणं ठरू शकतात जबाबदार; तज्ज्ञांनी सांगितले प्रभावी उपाय

Pune News: पुणे महापालिकेत सत्ताधारी-विरोधक भिडले; पाणीटंचाईवर चर्चा अर्धवट, बोपोडी दर्ग्यावरील कारवाईच्या मुद्द्यावरून वाद !

Sindhudurg Crocodile Rescue : सिंधुदुर्गात विहिरीमध्ये आढळलं मगरीचं कुटुंब! 1 मादी अन् तब्बल 15 पिल्लांना बाहेर काढताना वनविभागाची तारांबळ, पुढं काय झालं?

SCROLL FOR NEXT