Indian women’s cricket team to play 5-match T20 series in Bangladesh News sakal
Cricket

Ind vs Ban series : टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध 'या' महिन्यात खेळणार 5 सामन्यांची टी-20 मालिका! जाणून घ्या संपूर्ण शेड्यूल

भारत-बांगलादेश महिला संघात होणार पाच टी-२० सामन्यांची मालिका

Kiran Mahanavar

Ind vs Ban series : भारताचा महिला क्रिकेट संघ या वर्षी बांगलादेशमध्ये टी-२० मालिका खेळायला जाणार आहे. दोन देशांमध्ये २८ एप्रिल ते ९ मे या दरम्यान पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली.

भारताचा महिला संघ २३ एप्रिल रोजी बांगलादेशला पोहोचणार आहे. त्यानंतर पहिला सामना २८ एप्रिलला खेळेल. दोन देशांमध्ये ३० एप्रिलला दुसरा, २ मे रोजी तिसरा, ६ मे रोजी चौथा व ९ मे रोजी पाचवा सामना आयोजित करण्यात आला आहे.

पहिला, दुसरा व पाचवा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. तिसरा व चौथा सामना दिवसा खेळवला जाणार आहे. दोन देशांमधील पाचही सामने एकाच स्थळावर खेळवण्यात येणार आहेत. बांगलादेशमधील सिलहट येथे पाच सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ १० मे रोजी बांगलादेश येथून भारताकडे रवाना होईल.

भारत-बांगलादेश टी-२० मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - २८ एप्रिल (दिवस-रात्र)

  • दुसरा सामना - ३० एप्रिल (दिवस-रात्र)

  • तिसरा सामना - २ मे

  • चौथा सामना - ६ मे

  • पाचवा सामना - ९ मे (दिवस-रात्र)

(सर्व लढती सिलहट येथे पार पडणार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT