Indian Women Team To Face South Africa In Third T20 Match sakal
Cricket

IND W vs SA W : टी-20 मालिका वाचवण्याचे आव्हान, पावसामुळे खेळ होणार खराब? जाणून घ्या कसे असेल हवामान

भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी महिला टी-२० लढत आज

Kiran Mahanavar

India vs South Africa Women : एकदिवसीय व कसोटी मालिका जिंकलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघावर टी-२० मालिका गमावण्याची आपत्ती ओढवली आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दोन देशांमधील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज होत असलेला अखेरचा टी-२० सामना हा यजमान संघासाठी ‘करो या मरो’ असाच असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकल्यास त्यांना भारतामध्ये २-० अशी टी-२० मालिका जिंकता येणार आहे. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने या सामन्यात यश मिळवल्यास त्यांना १-१ अशी बरोबरीत मालिका राखता येणार आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघातील फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज यांनी आतापर्यंत चमक दाखवली आहे. दयालन हेमलता, शेफाली वर्मा यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची आशा आहे.

गोलंदाजीत सुधारणा आवश्‍यक

पहिल्या दोन लढतीत भारतीय गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी झालेली आहे. पूजा वस्त्रकार, दीप्ती शर्मा वगळता इतर गोलंदाजांना ठसा उमटवता आलेला नाही. रेणुका सिंग, सजीवन सजना, श्रेयांका पाटील, राधा यादव यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्यात आले आहे. भारतीय गोलंदाजांना उद्याच्या लढतीत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना रोखण्याचे काम करावे लागणार आहे.

पुन्हा पावसाची शक्यता

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील चेन्नईतील दुसरा टी-२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. आता चेन्नईतच या दोन देशांमधील अखेरचा सामना होणार आहे. हवामान विभागाकडून मंगळवारीही पावसाच्या व्यत्ययाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३० ते ४० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ट्रायऑनचे अपयश

दक्षिण आफ्रिकन महिला संघातील फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. ताझमिन ब्रिट्‌स, लॉरा वॉलवार्ड्‌ट, मेरीझेन केप, ॲनेक बॉच यांनी गरज असताना धावा उभारल्या आहेत. दक्षिण आफ्रिकन संघासाठी एकमेव चिंतेची बाब आहे सी. ट्रायऑन हिला पहिल्या दोन्ही लढतींत चमक दाखवता आलेली नाही. आगामी बांगलादेशमधील टी-२० विश्‍वकरंडकाकडे लक्ष देता तिने फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे.

आजची तिसरी लढत

  • भारत-दक्षिण आफ्रिका संध्याकाळी सात वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT