renuka singh sakal
Cricket

INDW vs BANW - Renuka Singh ची विक्रमी कामगिरी, भारतीय महिला बांगलादेशवर भारी

INDW vs BANW Renuka Singh - भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वर्चस्व गाजवले. रेणुका सिंगने विक्रमी कामगिरी केली

Swadesh Ghanekar

Indian Women vs Bangladesh Women Asia cup Semi Final 2024 - भारतीय महिला संघाने आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांगलादेश महिला संघावर वर्चस्व राखले. जलदगती गोलंदाज रेणुका सिंगने ( Renuka Singh) विक्रमी कामगिरी करताना बांगलादेशला धक्के दिले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रेणुका सिंगने बांगलादेशच्या आघाडीच्या तीन खेळाडूंना बाद करून भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली. दिलारा अक्तेर ( ६), मुर्शिदा खातून ( ४) व इश्मा तंजीम ( ८) या तिघींना रेणुकाने माघारी पाठवले. रेणुकाने ४-१-१०-३ अशी अप्रतिम स्पेल टाकली. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये रेणुका ( ७) आघाडीवर आहे. २०२२च्या ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेतही रेणुकाने ६ विकेट्स घेतल्या होत्या.

आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत रेणुकाने २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ५ धावांत ३ विकेट्स घेऊन सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली होती. आशिया चषक ट्वेंटी-२० स्पर्धेत सामन्यात ३ हून अधिक विकेट्स एकापेक्षा जास्त वेळेस घेणारी रेणुका ही पहिली जलदगती गोलंदाज ठरली आहे.

झुलन गोस्वामी आणि पूजा वस्त्राकर यांच्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स घेणारी रेणुका भारताची तिसरी जलदगती गोलंदाज आहे. रेणुकाने बांगलादेशला बॅकफूटवर फेकल्यानंतर राधा यादवने तीन विकेट्स घेतल्या. पूजा वस्त्राकर व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. बांगलादेशला ८ बाद ८० धावाच करता आल्या.

भारतीय महिला संघाने या संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवताना साखळी फेरीत पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळविरुद्ध दणदणीत विजय मिळवले आहे. UAE विरुद्ध भारताने विक्रमी २०१ धावा केल्या होत्या. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत रिचा घोषने सर्वाधिक ७ स्टम्पिंग केल्या आणि तिने तानिया भाटियाचा ( ६) विक्रम मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT