Ireland Beat Pakistan News Marathi sakal
Cricket

IRE vs PAK T20 series : पाकिस्तान आर्मी ट्रेनिंगचा पहिल्याच सामन्यात उडाला फज्जा; लिंबूटिंबू आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

Ireland beat Pakistan by 5 wickets News : पाकिस्तान संघाने गेल्या सहा महिन्यांत केवळ कोच, कर्णधारच नाही तर निवडकही बदलले आहेत. मात्र संघाची स्थिती जैसे थेच आहे.

Kiran Mahanavar

Ireland Beat Pakistan News : पाकिस्तान संघाने गेल्या सहा महिन्यांत केवळ कोच, कर्णधारच नाही तर निवडकही बदलले आहेत. आणि टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने आर्मी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले. मात्र संघाची स्थिती जैसे थेच आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला आयर्लंडकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

शुक्रवारी डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने एक चेंडू बाकी असताना 5 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. या सामन्यात पाकिस्तानचे स्टार गोलंदाज आयर्लंडच्या फलंदाजांसमोर हतबल दिसले.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 182 धावा केल्या होत्या. कर्णधार बाबर आझमने 57, तर सैम अयुबने 45 धावा केल्या. इफ्तिखार अहमदने 37 आणि शाहीन आफ्रिदीने 14 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आयरिश संघासमोर पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजांनी पाणी मागायला सुरुवात केली.

शादाब खान चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 54 धावा दिल्या. आणि त्याला विकेट पण मिळाली नाही. नसीम शाहने 4 षटकात 37 धावा दिल्या. पण नसीमला एकच विकेट मिळाली. तर शाहीन आफ्रिदीने 4 षटकात 26 धावा दिल्या, मात्र त्याला एकच यश मिळू शकले. इमाद वसीमने एक विकेट तर अब्बास आफ्रिदीला 2 बळी मिळाले, पण तेही खूप महागडे ठरले.

पाकिस्तानने 4.1 षटकात आयर्लंडचे दोन गडी बाद केले होते, मात्र त्यानंतर 104 धावांपर्यंत त्यांना एकही विकेट घेता आली नाही. आयर्लंडच्या फलंदाजांनी चांगली भागीदारी केली. त्यामुळे त्याने एक चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

आयर्लंडचा सलामीवीर अँड्र्यू बालबर्नीने 55 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावा केल्या. हॅरी टेक्टरने 36, जॉर्ज डॉकरेलने 24, गॅरेथ डेलेनीने 10 आणि कर्टिस कॅम्फरने 7 चेंडूत नाबाद 15 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंड 1-0 ने आघाडीवर आहे.

आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

आयर्लंडचा हा ऐतिहासिक विजय आहे. आयर्लंडने 17 वर्षांनंतर पाकिस्तानचा पराभव केला आहे. याआधी 2007 मध्ये आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Cricket Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या 'त्या' नववधुने केलं मोठं विधान!

Asia Cup 2025, IND vs PAK: पाकिस्तान सामन्याबाबत भारतीय संघाचा विचार काय? प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

PM Narendra Modi: मणिपूरमधून पंतप्रधान मोदींच्या सुशीला कार्कींना शुभेच्छा; स्पष्ट शब्दात म्हणाले...

Red object in galaxy : अवकाशात दिसले रहस्यमयी लाल ठिपके, पृथ्वीवर होणार गंभीर परिणाम? नेमका विषय काय, जाणून घ्या..

Latest Marathi News Updates : प्राण गमावलेल्यांच्या कृत्यांबद्दल ऐक्य व्यक्त करण्यासाठी बौद्धनाथ स्तूपाबाहेर मेणबत्ती मार्च

SCROLL FOR NEXT