Irfan Pathan on Hardik Pandya Marathi News sakal
Cricket

Irfan Pathan : 'भारतीय क्रिकेट सुधारायचं असेल तर...' हार्दिक पांड्यावरून इरफानने BCCIला दिला मोठा सल्ला

बीसीसीआयने श्रेयस अय्यर व ईशान किशन या दोन्ही क्रिकेटपटूंना धडा शिकवला.

Kiran Mahanavar

BCCI Central Contract : बीसीसीआयने श्रेयस अय्यर व ईशान किशन या दोन्ही क्रिकेटपटूंना धडा शिकवला. आयपीएल डोळ्यांसमोर ठेवून देशांतर्गत क्रिकेटला पाठ फिरवणाऱ्या या दोन्ही खेळाडूंची वार्षिक करारातून हकालपट्टी करण्यात आली. बीसीसीआयकडून या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या 30 खेळाडूंच्या यादीतून दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

ईशान किशन याने वैयक्तिक कारणासाठी सुट्टी घेतली होती. या दरम्यान तो आपला स्थानिक संघ झारखंडचेही प्रतिनिधित्व करीत नव्हता. हार्दिक पांड्या याच्यासोबत तो बडोदे येथे सराव करीत होता. श्रेयस अय्यर यानेही दुखापतीचे कारण सांगून मुंबई संघासाठी रणजी स्पर्धेमधून न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो तंदुरुस्त असल्याचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमार्फत सांगण्यात आले.

बीसीसीआयच्या 2023-24 च्या केंद्रीय करारनंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना पाठिंबा दिला. यासोबतच हार्दिक पांड्यावरून बीसीसीआयला सल्ला दिला आहे.

इरफान पठाण ट्विट करत म्हणाला की, 'श्रेयस आणि इशान दोघेही प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. आशा आहे की जोरदार पुनरागमन करतील. जर हार्दिक पांड्या सारख्या खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळायचे नसेल, तर त्याने आणि त्याच्यासारख्या इतरांनी राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना पांढऱ्या चेंडूच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घ्यावा का? जर हे सर्वांना लागू होत नसेल, तर भारतीय क्रिकेट अपेक्षित परिणाम साधू शकणार नाही.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही स्थानिक स्पर्धांना प्राधान्य न देणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात येईल, असा इशारा दिला होता. कर्णधार रोहित शर्मा याच्याकडूनही देशासाठी खेळण्याची भूक असलेल्यांनाच भारतीय संघात संधी देण्यात येईल, असे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यानंतर स्पष्ट करण्यात आले. अखेर बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यामधून दोघांनाही वगळण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT