Ishan Kishan News Marathi sakal
Cricket

Ishan Kishan : भारतीय संघात निवड होत नसल्यामुळे इशान किशन घेतला मोठा निर्णय; IPL 2024 आधी खेळणार 'ही' स्पर्धा?

Ishan Kishan Set To Play Dy Patil Tournament : भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन नोव्हेंबर 2023 पासून टीम इंडियातून बाहेर आहे....

Kiran Mahanavar

Ishan Kishan News : भारतीय यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन नोव्हेंबर 2023 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. आणि सध्या तो देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही. अशा स्थितीत त्याचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे.

त्याचवेळी काही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिल्याने बीसीसीआय नाराज आहे, त्यावर बोर्डाने कठोरता दाखवत भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

वास्तविक, दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर इशान किशनला संघातून वगळण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाने त्याला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे. मात्र, यष्टिरक्षक फलंदाजाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यास नकार दिला. सध्या तो बडोद्यात आयपीएल 2024 ची तयारी करताना दिसत आहे.

तो आयपीएल संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्यासोबत सराव करताना दिसला. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंनी 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुढील फेरीपूर्वी आपापल्या रणजी संघात सहभागी व्हावे, अशा सूचना बीसीसीआयने दिल्या आहेत.

पण आता नवीन वृत्त समोर आले आहे की, इशान किशन आयपीएल 2024 पूर्वी डीवाय पाटील स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या या युवा खेळाडूबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशान किशनने क्रिकेटमुळे आपल्या कुटुंबाला वेळ दिला नाही, त्यामुळे त्याने इतके दिवस क्रिकेटमधून सुट्टी घेतली. या काळात तो क्रिकेटपासून दूर राहिला. डीवाय पाटील स्पर्धेत तो खेळताना दिसणार असल्याचा दावा केला जात आहे.

भारतासाठी आतापर्यंतच्या कारकिर्दीत इशान किशनने दोन कसोटी, 27 एकदिवसीय आणि 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने अनुक्रमे 78, 933 आणि 796 धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT