James Anderson esakal
Cricket

James Anderson Catch : 41 वर्षाच्या अँडरसनचा भन्नाट कॅच, यशस्वी बाद झाला अन् भारत आला अडचणीत

James Anderson Catch Of Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल बाद झाला अन् भारताच्या फलंदाजीला गळती लागली. जेम्स अँडरसनने भन्नाट झेल घेत सर्वांना केलं अवाक

अनिरुद्ध संकपाळ

James Anderson Yashasvi Jaiswal Catch Video : भारताने चौथ्या कसोटीत विजयासाठी 192 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने 84 धावांची सलामी दिली. रोहित अर्धशतकाजवळ पोहचला होता तर यशस्वी आक्रमक फटके मारून सामना अजून जवळ आणण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तेवढच्यात जो रूटच्या एका चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला.

यशस्वी जैस्वालची विकेट जरी जो रूटने घेतली असली तरी त्याचं सगळं श्रेय मात्र 41 वर्षाच्या जेमी अँडरसनला जाते. त्याने कसोटीच्या चौथ्या दिवशी उत्कृष्ट डाईव्ह मारत झेल पकडला. सध्या हा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यशस्वी बाद झाल्यानंतर रोहित शर्मा देखील 55 धावांवर बाद झाला. पाठोपाठ रजत पाटीदार देखील शुन्यावर बाद झाला.

भारताची अवस्था बिनबाद 84 वरून 3 बाद 100 अशी झाली. भारताच्या 16 धावात 3 विकेट्स गेल्याने टेन्शन वाढले. मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि रविंद्र जडेजाने डाव सावरण्याचा प्रयत्न करत भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

यशस्वी जैस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप 2023 - 25 च्या सायकलमध्ये आपल्या 1000 धावा पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर होता. मात्र रूटला मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवरला नाही अन् अँडरसनने ही संधी न दवडता यशस्वीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

जरी यशस्वी जैस्वाल एक माईल स्टोन करण्यापासून चुकला असला तरी त्याने दुसरा माईल स्टोन मात्र गाठला. बाद होण्यापूर्वी त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली. आहे. विराट कोहलीने 2016 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 655 धावा केल्या होत्या. यशस्वीने देखील या मालिकेत 655 धावा केल्या आहेत. अजून त्याच्याजवळ एक कसोटी आहे. त्यामुळे यशस्वी विराटचा विक्रम मोडणार हे नक्की.

भारत - इंग्लंड एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

  • यशस्वी जैस्वाल - 2024 च्या मालिकेत 655 धावा

  • विराट कोहली - 2016 च्या मालिकेत 655 धावा

  • राहुल द्रविड - 2002 च्या मालिकेत 602 धावा

  • विराट कोहली - 2018 च्या मालिकेत 593 धावा

  • विजय मांजरेकर - 1961-62 च्या मालिकेत 586 धावा

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gavai : संघाच्या कार्यक्रमाला जाणं टाळलं, पण पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा; कमलताई गवई यांनी नेमकं काय म्हटलं?

FASTag नसल्यास १०० रुपयांऐवजी UPIने १२५ तर रोख २०० रुपये; टोलबाबत नवे नियम

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील सर्व खटले घेतले मागे

माेठी बातमी! 'पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण भोवणार'; नेमके काेणत्या शेतकऱ्यांचे सरकारी लाभ बंद होण्याची शक्यता..

Vidarbha Tigers: सह्याद्रीत घुमणार विदर्भातील वाघांची डरकाळी! स्थानांतरणास हिरवा कंदील, वन्यजीव-मानव संघर्ष टाळण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT