Jasprit Bumrah Hardik vs Rohit MI captaincy  sakal
Cricket

Mumbai Indians Captaincy - रोहित शर्मा - हार्दिक पांड्या कॅप्टन्सी वादावर अखेर Jasprit Bumrahने मौन सोडले

Hardik vs Rohit MI captaincy - मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२४ ही फार चांगली राहिली नाही. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे दिल्याने चाहत्यांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला.

Swadesh Ghanekar

Jasprit Bumrah on Hardik vs Rohit MI captaincy -इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ही चर्चेत राहिली ती मुंबई इंडियन्सच्या एका निर्णयामुळे... पाच जेतेपद जिंकून देणाऱ्या रोहित शर्माची हकालपट्टी करून फ्रँचायझीने नेतृत्व हार्दिक पांड्याकडे दिले अन् चाहते संतापले. Mumbai Indians च्या प्रत्येक सामन्यात चाहत्यांनी हार्दिकची हुर्यो उडवली. MI मैदानावर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याने हार्दिकला खूप टीकेला सामोरे जावे लागले. हार्दिकला कॅप्टन केल्यानंतर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याची एक पोस्टही चर्चेची ठरली होती. त्यावरून बुमराह या निर्णयावर नाराज असल्याचा अंदाज लावला गेला, पण अखेर गोलंदाज त्या सर्व प्रकरणावर व्यक्त झाला.

हार्दिकने भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इंडियन एक्स्प्रेस कट्ट्यावर जसप्रीतने मुंबई इंडियन्सच्या त्या निर्णयानंतर सुरू झालेल्या वादावर त्याचे मत व्यक्त केले. त्याने सांगितले की गोष्टी वाईट असल्या तरी, संघ कठीण काळात हार्दिकच्या पाठिशी उभा राहिला.

"आपण अशा देशात राहतो की तिथे भावनांना खूप महत्त्व आहे. फॅन्सच्या भावनांचा आम्ही आदर करतो. खेळाडूही भावनिक असतात. त्यामुळे त्याचा परिणाम भारतीय खेळाडू म्हणून तुमच्यावर होतो, परंतु तुमचे स्वतःचेच चाहतेही नीट बोलत नाही. मात्र, त्यावेळेसही तुम्हाला चेहऱ्यावर हसू ठेवावे लागले. तुम्ही लोकांना कसे थांबवू शकता? तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रीत केलं, तर ही टीकेची दारं तुम्ही बंद करू शकता. हे सोपं नाही. ते तुमच्यावर नजर रोखून असतात आणि तुम्हाला त्याचं म्हणणं ऐकू येतं,''असं जसप्रीत म्हणाला.

"पण मग तुमचे अंतर्मन मदत करते. आम्ही एक संघ म्हणून अशा गोष्टींना प्रोत्साहन देत नाही. एक संघ म्हणून आम्ही त्याच्यासोबत होतो. आम्ही त्याच्याशी बोलत होतो. त्याचे कुटुंब नेहमीच तिथे असेल. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात. पण, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या गोष्टी बदलल्या,” असेही बुमराहने इंडियन एक्सप्रेस अड्डा वर म्हटले.

तो पुढे म्हणाला,"तुम्ही त्या गोष्टी गांभीर्याने घेऊ शकत नाही. आता लोकं तुमचं कौतुक करत आहेत, याचा अर्थ टीका संपलेल्या नाहीत. जेव्हा आपण एखादा सामना गमावतो, तेव्हा ती टीका पुन्हा होऊ शकते. कारण आपण एक असा खेळ खेळतो जो खूप लोकप्रिय आहे. आम्ही पाहतो की जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्व गोष्टींचा सामना करतात."

हार्दिकवरील टीकेवर जस्सी पुन्हा म्हणाला की, ''एक संघ म्हणून एका माणसाला मागे सोडू शकत नाही. आम्ही एकमेकांसाठी आहोत. आम्ही एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळलो आहे, पण तो माझ्यापेक्षा तरुण असू शकतो. आम्ही एकत्र होतो आणि त्याला गरज पडली तेव्हा मदत करण्याचा प्रयत्न केला.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT