Ind vs Eng Test Cricket sakal
Cricket

Ind vs Eng Test Cricket : पाचव्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्‍चित

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन निश्‍चित समजले जात आहे. भारत- इंग्लंड यांच्यामध्ये सात ते अकरा मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन निश्‍चित समजले जात आहे. भारत- इंग्लंड यांच्यामध्ये सात ते अकरा मार्चदरम्यान धरमशाला येथे पाचवी कसोटी खेळवण्यात येणार आहे. या कसोटीत बुमरा खेळणार आहे. मात्र के. एल. राहुल अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नसल्यामुळे पाचव्या कसोटीत त्याच्या खेळण्याची शक्यता कमीच आहे.

आयपीएल, टी-२० विश्‍वकरंडक, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका अशा महत्त्वाच्या स्पर्धा आगामी काळात असल्यामुळे राहुलने पूर्ण तंदुरुस्त होण्याची गरज आहे. जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्‍चित समजले जात असले तरी अखेरच्या कसोटीत कोणत्या वेगवान गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येते हे पाहणे रंजक ठरणार आहे. आकाशदीप याने रांची कसोटीतील पहिल्या डावात ठसा उमटवला होता.

पडीक्कलला संधी?

के. एल. राहुलची अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा रजत पाटीदार याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र सहा डावांमध्ये त्याला फक्त ६३ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे देवदत्त पडीक्कल याचे कसोटीत पदार्पण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 AUCTION : पहिल्या सेटमध्येच कल्ला; पृथ्वी शॉ, सर्फराज खानचा समावेश असलेल्या यादीत ऑस्ट्रेलियन मोठी रक्कम घेऊन जाणार

Whatsapp Call Recording : खुशखबर! आता व्हॉट्सअ‍ॅपवरही करता येणार कॉल रेकॉर्डिंग; पण कसं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : बीडमधील केजमध्ये गावगुंडांची दहशत

संघात येण्यासाठी शॉर्टकट, १ लाखाची मागणी; BCCIच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार तरी दुर्लक्ष

Kolhapur CPR Hospital Scam : कोल्हापुरात सीपीआरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लुटलेल्या पैशाची वहीच आली बाहेर, ठाकरे गटाचं स्टिंग ऑपरेशन

SCROLL FOR NEXT