Jay Shah sakal
Cricket

New Coach For Indian Team : वर्ल्डकपनंतर भारतीय संघासाठी नवे प्रशिक्षक ; जय शहा,द्रविड उत्सुक असतील तर त्यांना अर्ज करावा लागेल

मुदतवाढ मिळालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हा कार्यकाळ येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबरोबर संपत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुदतवाढ मिळालेल्या भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हा कार्यकाळ येत्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेबरोबर संपत आहे. त्यांना पुन्हा प्रशिक्षकपदी कायम रहायचे असेल, तर नव्याने अर्ज करावा लागेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय संघासाठी नवे प्रशिक्षक मिळणार, हे निश्चित झाले आहे.

राहुल द्रविड आणि त्यांच्या प्रशिक्षक टीमचा मुख्य कार्यकाळ नोव्हेंबरमधील एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेबरोबर संपला होता; परंतु सहा महिन्यातच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा असल्यामुळे द्रविड आणि त्यांच्या टीमला मुदतवाढ देण्यात आली होती. प्रशिक्षक आणि त्यांच्या टीमसाठी आम्ही येत्या काही दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करणार आहोत. द्रविड यांना पुन्हा प्रशिक्षक व्हायचे असेल, तर त्यांना अर्ज करावा लागेल. पुढील तीन वर्षांसाठी आम्ही पुढचे प्रशिक्षक नेमणार आहोत, असे जय शहा यांनी सांगितले.

तिन्ही प्रकारांसाठी एकच प्रशिक्षक

इतर काही देशांमध्ये कसोटी आणि व्हाईटबॉल क्रिकेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त केले जातात; पण आपल्याकडे तिन्ही प्रकारांसाठी एकच प्रशिक्षक असेल; परंतु याबाबत अंतिम निर्णय सल्लागार समितीचा असेल, असे शहा यांनी सांगितले. जतिन परांजपे, अशोक मल्होत्रा आणि सुलक्षणा नाईक हे सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

आपल्याकडे काही खेळाडू तिन्ही प्रकारांत खेळतात. त्यामुळे वेगवेगळे प्रशिक्षकांचा प्रयोग उपयोगी ठरणार आहे, असे सांगताना जय शहा यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा या तिन्ही प्रकारांत खेळणाऱ्या खेळाडूंच्या नावांचा उल्लेख केला.

परदेशी प्रशिक्षकासाठीही मार्ग खुला

प्रशिक्षक आणि त्यांच्या टीमबाबतचा निर्णय सल्लागार समिती घेणार आहे. जाहिरात प्रसिद्ध केल्यावर परदेशी व्यक्तीने अर्ज केला, तर तेसुद्धा शर्यतीत असू शकतील. या सल्लागार समितीने परदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती केली, तर आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही शहा म्हणाले. राष्ट्रीय निवड समितीमधील एक जागा रिक्त आहे. त्यासाठी आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातून योग्य निवड लवकरच जाहीर केली जाईल, अशीही माहिती शहा यांनी दिली.

बीसीसीआयमध्येच राहणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षाअखेरीस पूर्ण होत आहे, या पदासाठी जय शहा प्रयत्न करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, या सर्व चर्चा आहेत, मला येथेच रहायचे आहे, मी येथे चांगले काम करत आहे की नाही, असा प्रश्नही त्यांनी हसत हसत विचारला.

वर्ल्डकपसाठी अनुभवी संघ

जून महिन्याच्या सुरुवातीस होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ अनुभवी आहे. तेथील परिस्थिती आणि खेळपट्यांनुसार संघ निवड करण्यात आल्याचे शहा यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू टप्य्या-टप्प्याने जाणार आहेत. जे संघ आयपीएलच्या प्लेऑफला पात्र ठरले नाहीत, त्यांचे खेळाडू २४ तारखेला प्रयाण करतील, असे शहा म्हणाले. त्यानुसार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू पहिल्या बॅचमध्ये असतील, हे निश्चित आहे.

अंतिम सामन्याचे ठिकाण बदला

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दोन्ही अंतिम सामने इंग्लंडमध्ये झाले आहेत आणि पुढचा सामनाही तेथेच नियोजित आहे. २००७ पासून हा अंतिम सामना वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्यासाठी आम्ही आयसीसीशी चर्चा करणार असल्याचे शहा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT