Josh Hazlewood sakal
Cricket

Josh Hazlewood: विश्‍वकरंडकाच्या फॉरमॅटवर हॅझलवूडची टीका

Josh Hazlewood On CWC T20 Format: ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्‍वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत घवघवीत यश संपादन केले. तीन विजयांसह त्यांनी ‘सुपर आठ’ फेरीतही प्रवेश केला आहे. मात्र, साखळी फेरीतील या कामगिरीचा ‘सुपर आठ’ फेरीत कोणताही फायदा होणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

नॉर्थ साऊंड : ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्‍वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत घवघवीत यश संपादन केले. तीन विजयांसह त्यांनी ‘सुपर आठ’ फेरीतही प्रवेश केला आहे. मात्र, साखळी फेरीतील या कामगिरीचा ‘सुपर आठ’ फेरीत कोणताही फायदा होणार नाही. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हॅझलवूड याने टी-२० विश्‍वकरंडकाच्या फॉरमॅटवर टीका केली आहे.

जॉश हॅझलवूड म्हणाला, साखळी फेरीत सर्व सामन्यांत विजय मिळवून चांगला नेट रनरेट ठेवल्यानंतरही याचा फायदा ‘सुपर आठ’ फेरीत होणार नाही. अशा नियमांचा टी-२० विश्‍वकरंडक पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे, याचे आश्‍चर्य वाटत आहे.

दरम्यान, हॅझलवूड याने फिरकी गोलंदाज ॲडम झॅम्पा याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. तो म्हणाला, ॲडम झॅम्पा हा ऑस्ट्रेलियन संघाचा अविभाज्य घटक आहे. त्याने एकदिवसीय तसेच टी-२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: 'मोहाडीतील महाराष्ट्र बँकेत दरोडा'; १७० ग्रॅम सोने, तीन लाख ६६ हजार घेऊन चोरटे पसार..

Mumbai News: नववर्ष स्‍वागताच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; नियम मोडल्‍यास कारवाई

Latest Marathi News Live Update : नागपुरात वंचितची काँग्रेससोबत आघाडीत -बिघाडी

Indian Post: लिखित परीक्षा नाही! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत काय?

नागपूर हादरलं! कुऱ्हाडीने वार करून पत्नी, चार वर्षाच्या मुलाची हत्या; जिल्ह्यात उडाली खळबळ, थरारक घटना..

SCROLL FOR NEXT