Kane Williamson  esakal
Cricket

Neil Wagner Retirement : वॅगनरच्या निवृत्तीवरून जुंपली! रॉस टेलरच्या आरोपांना कर्णधार विलियमसनचे कडक प्रत्युत्तर

अनिरुद्ध संकपाळ

Neil Wagner Retirement Controversy : न्यूझीलंडचा संघ तसा शांत स्वभावाचा आहे. हा संघ वादापासून खूप दूर असल्याने क्रिकेट जगतात त्यांचे एक विशेष स्थान आहे. मात्र न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरच्या निवृत्तीवरून वादंग निर्माण झाल्याने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष न्यूझीलंड संघाकडे खेचले गेला आहे.

न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरने नील वॅगनरला सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली असा आपोर केला होता. त्यावर आता केन विलियमसनने प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी नील वॅगनरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

37 वर्षाच्या वॅगनरने हा कठिण निर्णय प्रशिक्षक गॅरी स्टेडसोबतच्या संभाषणानंतर घेतला होता. यावेळी नील वॅगनर हा न्यूझीलंडच्या प्लेईंग 11 साठी पहिली पसंती असणार नाही असं सांगण्यात आलं होतं.

एएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना टेलर म्हणाला की, 'मला असं वाटतंय की आता या सर्व गोष्टीचा उलगडा होत आहे. नीलला सक्तीने निवृत्ती घ्यायला लावण्यात आली आहे असं मला वाटत आहे. तुम्ही जर नील वॅगनरची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर तो निवृत्त होणार होता मात्र ते ऑस्ट्रेलियावरूद्धच्या शेवटच्या कसोटीनंतर! त्यामुळे तो संघ निवडीसाठी उपलब्ध होता.'

न्यूझीलंडचा विलियम ओरोरके ज्यावेळी दुखापतग्रस्त झाला त्यावेळी नील वॅगनर बदली खेळाडू म्हणून मैदनावर आला होता. त्याला संघाने पहिल्या कसोटीसाठी थांबवून घेतलं होतं. मात्र त्याला पुढच्या दुसऱ्या कसोटीत प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

नीलच्या ऐवजी युवा बेन सेआरसला संधी देण्यात आली. यावरून देखील वाद निर्माण झाला होता. रॉस टेलरने यावर देखील टीका केली होती.

दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने पत्रकार परिषदेत सांगितले की नीलला कोणही सक्तीने निवृत्ती घ्यायला सांगितलेलं नाही. केन म्हणाला की, मला नाही वाटत की नीलला कोणी सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली आहे. मला वाटतं की गेल्या आठवडा त्याच्यासाठी उत्तम राहिला. हे त्याची कारकीर्द कशी जबरदस्त होती हे दाखवून देणारं होतं.'

'आम्ही ड्रेसिंग रूममध्ये काही अविस्मरणीय क्षण घालवले. त्याचा सेंड ऑफ परिपूर्ण नव्हता. नक्कीच मैदानावर कामगिरी करून तो निवृत्त झाला असता तर बरं झालं असतं. मात्र त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याने संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.'

'सर्वांनाच त्याची गुणवत्ता आणि आकडे माहिती आहेत. मात्र तो मैदानावर असताना जीव तोडून खेळायचा ती गोष्ट भावणारी होती. त्यामुळे गेला आठवडा खास होता. मला वाटतं की त्याने संघासोबत खूप चांगला वेळ घालवला आहे.'

(Cricket News In Marathi)

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT