Shreyas Iyer Injury IPL 2024 KKR Latest News Marathi sakal
Cricket

IPL 2024 : KKR साठी वाजवली धोक्याची घंटा; कर्णधार Shreyas Iyer सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर? मोठे कारण आले समोर

Shreyas Iyer Injury News : आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक आठवड्याआधी कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.

Kiran Mahanavar

Shreyas Iyer Injury News : आयपीएल 2024 सुरू होण्याच्या एक आठवड्याआधी कोलकाता नाईट रायडर्ससाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. कोलकाताला कर्णधार श्रेयस अय्यरच्या रूपाने मोठा धक्का बसू शकतो.

आजकाल अय्यर रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईकडून विदर्भाविरुद्ध खेळत आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अय्यरने दुसऱ्या डावात मुंबईसाठी शानदार फलंदाजी केली आणि १० चौकार आणि ३ षटकारांसह ९५ धावा केल्या, पण इथूनच त्याच्या अडचणींना सुरुवात झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या डावात फलंदाजी केल्यानंतर अय्यरची जुनी दुखापत पुन्हा एकदा उद्भवली. आता आयपीएल सुरू होण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक आहे, अय्यरच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सची चिंता वाढली आहे. दुखापतीमुळे अय्यरला गेल्या हंगामात ही मुकावे लागले होते आणि आता या वेळी पुन्हा तो पहिल्या काही सामन्यांना मुकणार हे निश्चित दिसत आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका सूत्राने सांगितले की, रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या म्हणजे पाचव्या दिवशी अय्यर मैदानावर क्वचितच दिसणार आहे.

अहवालात पुढे म्हटले आहे की, रणजी फायनलच्या चौथ्या दिवशी अय्यर मैदान सोडून स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होतो. या डावात त्याला दोनदा पाठदुखीचा त्रासही झाला होतो, ज्यावर मुंबईच्या फिजिओने उपचार केले. अय्यरची ही तीच जुनी दुखापत आहे, ज्यासाठी गेल्या वर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

याशिवाय, सूत्राने असेही सांगितले की, इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान अय्यरने दुखापतीची तक्रार केली होती. मात्र, अय्यरच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता अय्यर सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये खेळू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horrible Accident: मदतीसाठी किंकाळ्या, पण दार उघडलेच नाही… 17 जीव आगीत होरपळले, भीषण बस दुर्घटना!

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र ताकद दाखवणार? स्वबळावर लढण्याचा निर्धार

Kashmiri Pheran: लोकल ते ग्लोबल ओळख बनलेला काश्मिरी फेरन, वाचा कसा बनतो आणि काय आहे त्याची खासियत

'विझलो जरी मी...', पोस्ट ठरली अखेरची, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसे नेत्याचा अपघाती मृत्यू

Satara Fraud: 'साताऱ्यातील महिलेला २५ तोळे दागिन्यांना गंडा'; मैत्री नडली अन् चाैकशीत आलं धक्कादायक कारण समाेर..

SCROLL FOR NEXT