Himanshu Mantri Madhya Pradesh vs Vidarbha Ranji Trophy Marathi News  sakal
Cricket

Ranji Trophy : मध्य प्रदेशच्या मंत्रीने विदर्भाविरुद्ध ठोकले शतक अन् केली 'ही' मोठी कामगिरी

Madhya Pradesh vs Vidarbha Ranji Trophy 2nd Semifinal : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात धावांचा पाऊस पडत आहे.

Kiran Mahanavar

Himanshu Mantri Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. खरंतर रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य फेरीचे सामने 2 मार्चपासून खेळल्या जात आहे. एकीकडे मुंबई आणि तामिळनाडू यांच्यात सामना खेळला जात आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि विदर्भ यांच्या पण उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेशचा स्टार फलंदाज हिमांशु मंत्री याने शानदार शतक झळकावले. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील सहावे शतक आहे, जे त्याने 212 चेंडूत पूर्ण केले.

हिमांशूच्या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशने विदर्भाविरुद्ध पहिल्या डावात आघाडी घेतली. या सामन्यात त्याने 265 चेंडूंचा सामना करत 126 धावा केल्या. यादरम्यान 30 वर्षीय फलंदाजाने 13 चौकार आणि एक षटकार मारला. विदर्भाने पहिल्या डावात सर्व गडी गमावून 170 धावा केल्या. आवेश खानने चार विकेट घेतल्या.

हिमांशु मंत्रीची कारकीर्द होती कशी?

हिमांशु मंत्रीने 2019 मध्ये बडोद्याविरुद्ध प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 28 सामन्यांच्या 46 डावात 1811 धावा केल्या आहेत. यात सहा शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 165 आहे. या मंत्रीचा लिस्ट ए मध्येही चांगला रेकॉर्ड आहे. तीन सामन्यांत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 260 धावा केल्या आहेत.

हिमांशू या मोसमात मध्य प्रदेशसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आठ सामन्यांच्या 13 डावात 600 हून अधिक धावा केल्या. याआधी त्याने ओडिशा आणि बडोदाविरुद्ध शतके झळकावली होती. त्याचबरोबर त्याने पुद्दुचेरी आणि जम्मू-काश्मीरविरुद्ध अर्धशतके झळकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार? गौतम गंभीरला रिप्लेस करण्याच्या चर्चांवर VVS Laxman चे मोठे विधान; गेली चार वर्ष मी...

NEET Student Death नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थीनीनं उचललं टोकाचं पाऊल; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Minister Daughter Protest: आंदोलनात मंत्र्याची मुलगी, वडिलांना ट्रोल करणं चुकीचं; मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

Latest Marathi News Live Update : संसदेवर आणखी एका मोर्चाची घोषणा; आता कोणाच्या राजीनाम्याची होत आहे मागणी? 'E-20 जनता पार्टी' उतरली मैदानात

'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, 'धमाल होणार!'

SCROLL FOR NEXT