Ajinkya Rahane Sakal
Cricket

Ajinkya Ranane याला महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत भूखंड मंजूर, वांद्रे येथे उभी राहणार मोठी ऍकेडमी

Ajinkya Rahane Allotted Land in Bandra: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रे येथे भूखंड मंजूर केला असून तिथे आता क्रिकेट अकादमी उभी राहणार आहे.

Pranali Kodre

Cabinet Approves Land Allotment to Ajinkya Rahane: भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला महाराष्ट्र सरकारकडून मोठी मदत जाहीर झाली आहे. सोमवारी (२३ सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पाडली. या बैठकीदरम्यान रहाणेला वांद्रेमध्ये भूखंड मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल त्यानेही आभार मानले आहेत.

रहाणेला वांद्रेमध्ये सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी हा भूखंड मंजूर करण्यात आला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार गेल्या काही वर्षांपासून वांद्रेतील म्हाडाच्या मालकीचा भूखंड क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित होता.

या भूखंडावर अकादमी उभारण्यास सुनील गावसकर यांनी १९८८ मध्ये असमर्थताही दाखवली होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्याचे वितरण म्हाडाने रद्द केले होते. पण काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांनी रहाणेला हा भूखंड देण्याची मागणी मुंबई मंडळाकडे केली होती. त्यानंतर आता रहाणेला हा भूखंड मंजूर करण्यात आला आहे.

रहाणेने याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. रहाणे म्हणाला, 'मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी, बीसीसीआयचे खजीनदार आशिष शेलार यांचे मी आभार मानतो की त्यांनी मुंबईमध्ये जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी आणि सुविधा निर्माण करण्याच्या माझ्या ध्येयाला पाठिंबा दिला.'

'ही अकादमी युवा खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा आणि मार्गदर्शनामुळे सक्षम करेल, ज्या शहरात माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला त्या शहरातील पुढच्या पिढीच्या चॅम्पियन्सला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी आणि नेतृत्वासाठी मी कृतज्ञ असेल.'

रहाणे नुकताच काऊंटी क्रिकेट खेळून पुन्हा भारतात परतला आहे. आता तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. सध्या रहाणे भारताच्या संघातून बाहेर आहे.

रहाणेने ८५ कसोटी सामन्यांमध्ये १२ शतके आणि २६ अर्धशतकांसह ५०७७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९० वनडेत ३ शतके आणि २४ अर्धशतकांसब २९६२ धावा केल्या, तर २० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने एका अर्धशतकासह ३७५ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT