MS Dhoni IPL 2024  esakal
Cricket

MS Dhoni IPL 2024 : धोनीचा हा शेवटचा हंगाम... थला कधी थांबणार? खास मित्रानं स्पष्टच सांगितलं

MS Dhoni IPL 2024 : धोनीचा आयपीएल 2024 हा शेवटचा हंगाम असेल का..? त्याच्याच जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni IPL 2024 : महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल 2024 च्या तयारीला लागला आहे. गेल्या हंगामात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया देखील झाली. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा हा थला शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार अशी चर्चा सुरू झाली होती.

यावर ना धोनीने ना सीएसकेने अधिकृत वक्तव्य केलं आहे. मात्र आता धोनीचा खास दोस्त परमजीत सिंहने धोनी कधीपर्यंत आयपीएल खेळू शकतो याची माहिती दिली.

वन क्रिकेटने दिलेल्या माहितीनुसार परमजीत सिंहने सांगितले की महेंद्रसिंह धोनी हा अजून एक ते दोन हंगाम खेळू शकतो.

परमजीत सिंह म्हणाला की, 'मला असं वाटत नाही की धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. तो अजूनही फिट आहे. मला असं वाटतं की तो अजून एक किंंवा दोन आयपीएल हंगाम सहज खेळू शकतो. तो नक्कीत अजून एक हंगाम खेळू शकतो. याचं कारण म्हणजे तो फिट आहे.'

दरम्यान, धोनीने पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचे बंध जपले. यावेळी धोनीने बालपणीच्या मित्राच्या स्पोर्ट्स शॉपचे प्रमोशन केलं. त्याने युनिक बॅट स्टिकर वापरलं. त्याने हे प्रमोशन रांची येथील एका सराव सत्रादरम्यान केलं. यामुळे चाहते आणि माध्यमात या स्टिकरची आणि पर्यायाने धोनीच्या मैत्रीची देखील जोरदार चर्चा झाली.

धोनीने आपल्या बॅटवर प्राईम स्पोर्ट्सचे स्टिकर लावले होते. प्राईम स्पोर्ट्स शॉप हे धोनचा बालपणीचा मित्र परमजीत सिंहचे आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

SCROLL FOR NEXT